Tarun Bharat

नाक्यावर भटक्या प्राण्यांची दादागिरी

प्रतिनिधी/ सातारा

 कोरोनाची सातारा शहरवासीयांच्या मनात चांगलीच धडकी भरली आहे.असे असताना शहरातील रस्त्यावर भटकी कुत्री, गाढवे यांची मोठी संख्या दिसू लागली आहे.अगदी पोवई नाक्यावर तर दोन दिवसांपूर्वी एका दुचाकी चालकाला भटक्या कुत्राने चावा घेतल्याची घटना घडली.पालिकेच्या आरोग्य विभागाकडे भटक्या कुत्र्यांवर उपाय योजना करण्याची यंत्रणाच नाही.काही वर्षांपूर्वी शहरात राबवण्यात आलेली निरबीजिकरण मोहिमेचे काम करणाया ठेकेदाराचे अजून बिल काढले नसल्याचे आरोग्य विभागात जोरदार चर्चा सुरू आहे.

शहरातल्या कोणत्याही रस्त्यावर भटक्या कुत्री, गाढवे यांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या पाच महिन्यात लॉक डाऊनमध्ये शहरातील रस्ते शुकशुकाट होते.आता थोडी तुरळक गर्दी रस्त्यावर दिसू लागली आहे.मात्र, त्या वाहनधारकांना कोरोना इतकीच भटक्या कुत्र्याची आणि गाढवांची आहे.पालिकेकडे भटक्या कुत्र्यावर आळा घालण्यासाठी उपाय योजना करण्यासाठी यंत्रणाच नाही.त्यामुळे शहरात ठिकठिकाणी प्रादुर्भाव वाढू लागला आहे.पालिकेने पाठीमागे शहरात निरबीजिकरण मोहीम राबविण्यात आली होती.त्याचे बिलच काढले नव्हते अशी चर्चा जेव्हा जेव्हा शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्न उपस्थित होतो तेव्हा घडते.नगरसेवक धनंजय जांभळे यांनी ही निवेदन दिली आहे.पालिकेच्या आरोग्य विभागाकडे डॉग व्हॅन नाही, अशी शोकांतिका व्यक्त होत आहे.

Related Stories

राज्यातील कोरोनामुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी

Archana Banage

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार ; जामिनाविरोधात ईडीची सर्वोच्च न्यायालयात याचिका

Archana Banage

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची सुमो चोरीला

datta jadhav

आंदोलनप्रकरणी 74 शेतकऱ्यांवर गुन्हे

datta jadhav

महामार्गावर उसाचा ट्रक्टर पेटला

Patil_p

आंबेघर, मिरगाव अन् ढोकावळेचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणार

datta jadhav