Tarun Bharat

नागठाणेत दारूच्या नशेत युवकाची आत्महत्या

प्रतिनिधी / नागठाणे : 

दारूच्या नशेत पाडळोशी (ता.पाटण) येथील युवकाने नागठाणे (ता.सातारा) येथे आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. अजय रामचंद्र ढेरे (वय.३२,रा.मूळ रा.पाडळोशी, ता.पाटण, हल्ली रा.सातारा) असे या युवकाचे नाव आहे.      

अजय ढेरे हा पत्नीसह सातारा येथे राहत असून, तो वाहनचालक म्हणून काम करत होता. त्याला दारू प्यायचे व्यसन होते. नागठाणे येथे त्याचा मावसभाऊ आकाश निकम राहत असून, अजय ढेरेचे वरचेवर येणे-जाणे होते. गुरुवारी सकाळी अजय ढेरे हा नागठाणेत आला होता. मावसभावाकडे जेवण करून पुन्हा सातारला जाण्यासाठी रात्री निघाला. तो दारू पिला होता. शुक्रवारी सकाळी आकाशच्या घराजवळ असलेल्या राजदीप रांजणे यांच्या मालकीच्या खताच्या गोडाऊन जवळील शेडच्या छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने अजय ढेरे याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याची फिर्याद मावसभाऊ आकाश नारायण निकम याने बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून, पुढील तपास साहाय्यक फौजदार रामचंद्र फरांदे करत आहेत.

Related Stories

शाहूपुरीतील जवानाला नागालॅण्डमध्ये वीरमरण

Patil_p

सातारा : बालकांच्या संरक्षणासाठी ‘चाईल्ड लाईन’ तत्पर

Archana Banage

Satara : खासदार उदयनराजे भोसले यांना काळ्या यादीत टाकण्यासाठी ठेकेदार सापडला

Abhijeet Khandekar

किल्ले प्रतापगडावर शिवजयंती उत्साहात

datta jadhav

म्हसवड -हिंगणी रस्ता वाहतुकीस खुला करण्यासाठी नागरिकांचे पालिकेत ठिय्या आंदोलन

Archana Banage

प्रजासत्ताक दिनी साताऱ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Archana Banage
error: Content is protected !!