Tarun Bharat

नागठाणेत विवाहितेचा खून

प्रतिनिधी / नागठाणे :     

नागठाणे (ता.सातारा) येथे एका महिलेचा खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मालन बबन गायकवाड (वय 55, रा.नागठाणे, ता.सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.     

नागठाणे येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रशाळेसमोर असणाऱ्या चाळीतील एका खोलीत ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ. सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबीकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी सुचना दिल्या. घटनास्थळी ठसे तज्ञांना पाचारण केले आहे. पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे. ऐन आषाढी एकादशी दिवशीच खुनाची घटना उघडकीस आल्याने नागठाणे गावात एकच खळबळ उडाली आहे.

Related Stories

लाकडाची अवैध वाहतूक करणाऱया दोघांना अटक

Patil_p

सातारा तालुक्याने गाठली 71

Patil_p

सातारा नगरपालिके तर्फे आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा रविवारी

Patil_p

सप्टेंबरमध्ये तिसऱ्या वेळी निच्चांकी बाधितवाढ

datta jadhav

सिटी पोलीस लाईनमध्ये स्वच्छता अभियान राबवा

Archana Banage

सातारा : मंगळवार तळ्यातील मृत मासे काढण्याच्या कामाला प्रारंभ

Archana Banage
error: Content is protected !!