Tarun Bharat

नागठाणे विद्यालयात चोरी

Advertisements

प्रतिनिधी / नागठाणे :

नागठाणे (ता.सातारा) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री रामकृष्ण विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये अज्ञात चोरट्याने कार्यालयाचा कडी-कोयंडा उचकटून रोख रक्कम लंपास केली. शनिवारी पहाटे १ च्या सुमारास ही घटना घडली.

अज्ञात चोरट्याने कटावणीने कार्यालयाचा कडी-कोयंडा तोडला. त्यानंतर आतील पाच लोखंडी कपाटेही फोडली. यावेळी एका कपाटात असलेली काही हजारांची रोख रक्कम चोरट्याने लांबवली. यानंतर त्याने शेजारी असलेल्या उपप्राचार्याच्या केबिनचा कडी-कोयंडाही तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र आवाज झाल्याने घाबरलेल्या चोरट्याने पलायन केले.चोरट्याच्या हालचाली विद्यालयाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. घटनास्थळी बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ.सागर वाघ व पोलीस जवानांनी भेट देऊन पाहणी केली. तक्रार दाखल करण्याचे काम बोरगाव पोलीस ठाण्यात सुरू होते.

Related Stories

टीईटी परिक्षेला बसू न दिल्याचा परिक्षार्थ्यांचा आरोप

Patil_p

जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये रेन वॉटर हारवेस्टींग प्रकल्प

Patil_p

सेव्हनस्टारच्या परिसरात युवकांकडून नियमांना तिलांजली

Amit Kulkarni

फलटणमध्ये दोन चोरटे जेरबंद

Patil_p

लस घेतलेले शिक्षक घरातच

Patil_p

वातावरणातील बदलाने नागरिक हैराण

Patil_p
error: Content is protected !!