Tarun Bharat

नागपंचमी उत्साहात साजरी

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

 श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी, श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले, तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. यादिनाचे औजित्य साधुन शुक्रवारी घरोघरी मोठय़ा उत्साहात नागपंचमी साजरी करण्यात आली. यानिमित्त नागाच्या मुर्तीचे पुजन, तसेच नैवेद्य म्हणून पुरणपोळय़ा, दिंडय़ा, लाहय़ा, लाडू आदींची रेलचेल बनविण्यात आली होती.

 त्याचबरोबर शहरातील शाहुनगर, नागाचापार-मंगळवार पेठ व करंजे-झेंडा चौक येथील मंदिरामध्ये नागाच्या मुर्तीचे पुजन करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. सध्या मंदिरे जरी बंद असली तरी मंदिरा बाहेरूनच पुजन करण्यात आले. याचबरोबर सुवासिनींतर्फे दुध व लाहय़ा अर्पन करून वारूळाचे पुजन ही करण्यात आले. यादिनाचे औचित्य साधुन महिला वर्गांकडुन उपवास देखिल धरला जातो. तसेच पुर्वी यासणाची चाहुल लागताच झाडाखाली किंवा घराच्या अंगणात झोपाळे बांधण्यात येत होते. पण आता मात्र शहरात तितकीशी जागा उपलब्ध होत नसल्याने ही परंपरा मोडीत निघत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.

 यासणाच्या निमित्ताने बाजार पेठेत ग्राहकांची गर्दी ही मोठय़ा प्रमाणात झाली होती. विशेष म्हणजे या दिनाचे औचित्य साधुन सुवासिनी महिलांतर्फे नव्याने हातात चुडा भरला जातो. त्यामुळे शहरपरिसरातील सर्व कासारांच्या दुकानांमध्ये एकच गर्दी झाली होती. त्याचबरोबर सुवर्णांकार दुकानात ही लहान मोठ्ठे दागिने खरेदी करण्यासाठी एकच गर्दी झाली होती. विशेष म्हणजे नवविवाहित वधु-वरांचा पहिलाच सण असल्याने कित्तेक वधु या आपल्या माहेरी गेल्या होत्या.

Related Stories

गडचिरोली : पोलिसांसोबतच्या चकमकीत 13 नक्षलवादी ठार

Rohan_P

एसटी कॉलनीत गटर रस्त्यावर

Amit Kulkarni

वाई वनविभाग आणि महसूलमध्ये जुंपली

datta jadhav

काहीही झाले तरी विजेचा स्थिर आकार भरणार नाही !

Abhijeet Shinde

5G सुपरफास्ट…लवकरच…!

Abhijeet Khandekar

आईकडे जाता येत नसल्याच्या नैराश्यातून युवतीची आत्महत्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!