Tarun Bharat

नागपाडातील एका इमारतीचा काही भाग कोसळला; मदत कार्य सुरू

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


मुंबईतील मालाडमधील व महाड येथील इमारत दुर्घटना ताजी असतानाच दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरात आणखी एका इमारतीचा भाग कोसळल्याची घटना गुरूवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. 


मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये चार जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले आहे.


कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली चार जण अडकल्याचे वृत्त आहे. दरम्यान, इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती अग्निशमक दलाला देण्यात आली. जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत मदत कार्य सुरू केले आहे. अग्निशमक दलाची पाच वाहने, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

Related Stories

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

Abhijeet Shinde

दहावी बारावीच्या परीक्षा पारदर्शकतेसाठी शिराळा तहसीलदारांचा अनोखा उपक्रम

Sumit Tambekar

अमेरिकेत ‘टिकटॉक’ बंदीला पुन्हा स्थगिती

datta jadhav

बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत किशोरी पेडणेकरांचा भाजपला इशारा

Abhijeet Shinde

अण्णा हजारेंची बेमुदत उपोषणाची घोषणा

datta jadhav

संपूर्ण लसीकरणात देशात ‘महाराष्ट्र’ अग्रस्थानी!

Rohan_P
error: Content is protected !!