Tarun Bharat

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या 268 वर

ऑनलाईन टीम / नागपूर :

देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. नागपुरात गेल्या दोन दिवसात 106 कोरोना बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना ग्रस्तांचा आकडा 268 वर पोहचला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 268 रुग्णांपैकी तीन रुग्णांच्या मृत्यूंची नोंद असून काल आणखी दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता पर्यंत 65 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. बुधवारी 68 तर गुरुवारी 38 रुग्ण पॉझिटिव आले. यातील बहुतेक रुग्ण हे मोमिनपुरा व सतरंजीपुऱ्यातील आहेत. 

अचानक रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने नागपूर मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागपुरात पहिल्या कोरोना रुग्णांची नोंद 11 मार्च रोजी झाली. त्यानंतर पहिले 100 रुग्ण गाठायला 44 दिवसांचा कालावधी लागला पण त्यानंतर चे 100 रुग्णांची नोंद अवघ्या 13 दिवसांमध्ये झाली. 

Related Stories

राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री राजभवनावर

Archana Banage

सीएए, एनआरसी विरोधात आवाज उठविण्याची वेळ : पुजा भट्ट

prashant_c

नितीन गडकरींच्या प्रयत्नातून वर्ध्यात म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शनची निर्मिती

Archana Banage

मुळातच राजू शेट्टी हे आमच्यासोबत होते

datta jadhav

काहींचा मेंदू खोटा, राज्यापालांबाबत गप्प बसणारे दोषी, उदयनराजे संतापले

Rahul Gadkar

भारताचा गरीबी आणि असमानता असलेल्या देशात समावेश

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!