- पंतप्रधानांकडून ट्विट करत शोक व्यक्त
ऑनलाईन टीम / नागपूर :
नागपूरच्या वेल ट्रीट कोरोना रुग्णालयात काल रात्री आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर प्रमाणत जखमी झाले आहेत. मृत व्यक्तींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.


शाॅट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागली तेव्हा या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार चालू होते. आग लागल्याने सगळीकडे मोठा गोंधळ उडाला. रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आले. यावेळी रुग्णालयातील 27 गंभीर रुग्णांना सरकारी मेडिकल कॉलेज आणि इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले.


या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. ते नागपूर रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे मी दु: खी आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांबद्दल माझ्या संवेदना आहेत. या घटनेत जखमी लोक लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.
नागपूर नगम निगमचे प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले की, रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील आयसीयूच्या एसी युनिटमध्ये पहिल्यांदा आगीला सुरुवात झाली. या आगीत 4 जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आणि काही काळाने आगीवर नियंत्रण मिळवले.