Tarun Bharat

नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांना कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / नागपूर : 


कोरोना काळातही शासकीय यंत्रणेचा कारभार मोठ्या जबाबदारीने सांभाळणारे नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द मुंढे यांनीच ट्विट करत याबाबतची माहिती दिली. 


ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मात्र, सध्या माझ्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाही आहेत त्यामुळे मी होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मागील 14 दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच कोरोना चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.


पुढे ते म्हणाले, कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असली तरीही यापुढील काही दिवस आपण घरुनच कामकाज पाहीन तसेच नागपूरमधील परिस्थिती हाताळण्यासाठी या काळातही आपण काम करतच राहू अशी हमी देत त्यांनी, आपण कोरोनासोबतचा हा लढा नक्कीच जिंकू असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.  

Related Stories

“काम झालेले नसतानाही पंतप्रधानांकडून मेट्रोचे उद्घाटन”

Abhijeet Khandekar

मुख्यमंत्र्यांकडून बंडखोर आमदारांच्या खात्याचं फेरवाटप; 5 मंत्री आणि 4 राज्यमंत्र्यांचा समावेश

Abhijeet Khandekar

देशातील एकूण कोरोना रुग्ण संख्येच्या 25% रुग्ण एकट्या महाराष्ट्रात

Tousif Mujawar

ISRO ने रचला इतिहास; बाहुबली ‘LVM-3’चे व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी

datta jadhav

शिवसेनेतल्या दोन गटातला संघर्ष आहे, भाजपचा संबंध नाही- चंद्रकांत पाटील

Abhijeet Khandekar

पद्मश्री डॉ. अशोक पानगडिया यांचे निधन

Tousif Mujawar