Tarun Bharat

नागपूर – रत्नागिरी महामार्गासाठी जमिण मोजणी भुये परिसरातील शेतकऱ्यांनी पाडली बंद

वार्ताहर / शिये

प्रस्तावित नागपूर – रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाबाबत स्वतंत्र बैठक घेऊन तोडगा काढण्याच्या पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पत्रास डावलून भुये, भुयेवाडी परिसरात ड्रोन च्या सहाय्याने सुरू असलेली मोजणी येथील शेतकऱ्यानी बंद पाडली.

माजी आमदार चंद्रदिप नरके यांनी भ्रमणध्वनी वरुन ही मोजणी बंद करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. नागपूर – रत्नागिरी महामार्गाच्या कामासाठी शिये ते पडवळवाडी या भागातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या रस्त्यांमुळे परिसरातील मोठ्या प्रमाणावर सुपिक शेती जाणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. परिणामी या रस्त्याच्या रेखांकनास विरोध आहे. सुमारे चारशे लोकांच्या जीवनाचे निगडीत हा प्रश्न असल्याने पालकमंत्री, खासदार व संबंधित अधिकारी यांच्या बरोबर बैठक लावावी. तसेच शेतकऱ्यांच्या हरकतीवरती सुनावणी होत नाही, तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना शेतामध्ये फिरू देणार नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे सुरू असलेली मोजणी बंद पाडली.

यावेळी पंचायत समिती माजी सदस्य कृष्णात पोवार, बाजीराव पाटील, तानाजी चौगले, बाबासो पाटील, सर्जेराव निरूखे, देव पाटील, रामचंद्र पाटील, जयसिंग पाटील, सुभाष साळुंखे, अरुण पाटील, विलास कागवाडे, के. बी. खुटाळे, आनंदा पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

इराणहून आलेल्या कोल्हापूरच्या महिलेचा जोधपूरमध्ये मृत्यू

Archana Banage

Kolhapur : गर्भलिंग निदान प्रकरणी डॉक्टर व एजंट यांना अटक; राधानगरी पोलिसांची कारवाई

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : मायक्रोफायनान्सच्या फेऱ्यामध्ये महिला का अडकत आहेत? त्यावर उपाययोजनेसाठी अभ्यासगट नियुक्त करणार : मंत्री मुश्रीफ

Archana Banage

कोल्हापूर : लक्षतीर्थ परिसरात तीन गवे

Archana Banage

‘आपत्ती व्यवस्थापन’च्या ‘अलर्ट’ची चाचपणी

Archana Banage

कोल्हापूर : वाकरेत बिबट्यासदृश्य प्राण्याच्या दर्शनाने परिसरात घबराट

Archana Banage