Tarun Bharat

नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

वार्ताहर/ आबलोली

गुहागर तालुक्यातील पडवे जिल्हा परिषद गटात मुंबई-पुणे व अन्य भागांतून आलेल्या आणि विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्यांना जीवनावश्यक साहित्य वाटपाचा शुभांरभ आबलोली येथे आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला.

   या गटातील सुमारे 12 हजार नागरिकांना जेवण मिळू शकेल इतके धान्य व अन्य साहित्य वाटप करण्यात येणार आहे. यावेळी बोलताना आमदार जाधव यांनी, नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेश नाटेकर, तालुकाप्रमुख सचिन बाईत, पंचायत समिती सदस्य पूर्वी निमूणकर, रवींद्र आंबेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱयांचे कौतुक केले. यावेळी उपतालुकाप्रमुख संजय बाईत, विभागप्रमुख नरेश निमुणकर, शाखाप्रमुख संदीप निमुणकर, महिला आघाडीच्या वनिता डिंगणकर, शरद साळवी आदी उपस्थित होते.

Related Stories

गुहागरच्या टंचाई कृती आराखडय़ात 45 गावे 169 वाडय़ा

Omkar B

नौकेला हर्णे बंदरात जलसमाधी!

Patil_p

कोरोना काळात काम केलेल्या ‘कंत्राटीं’ना भरतीमध्ये प्राधान्य!

NIKHIL_N

जिल्हा बँकेवरील विजयोत्सवाने बांद्यात आतषबाजी

Anuja Kudatarkar

वेंगुर्ले-वजराटचा सुपुत्र अनिकेत वजराटकर बनला एम. एस. डॉक्टर

NIKHIL_N

चुकीच्या पद्धतीच्या कामामुळे रुग्ण व रहिवाशांना होतोय त्रास!- डाॅ. जयेंद्र परुळेकर

Anuja Kudatarkar