Tarun Bharat

नागालँडमध्ये कुत्र्याच्या मांस खरेदी-विक्रीस बंदी

ऑनलाईन टीम / कोहिमा :

नागालँड सरकारने कुत्र्याचे मांस खरेदी-विक्री करण्यास बंदी घातली आहे. नागालँडचे मुख्य सचिव तेमजेन तॉय यांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. 

भारतातील अनेक राज्यात कुत्र्यांचे मांस खाल्ले जाते. त्यामध्ये जास्त प्रोटीन असते असे समजले जाते. नागालँडमध्येही कुत्र्याचे मांस खाल्ले जाते. मात्र, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुत्र्यांच्या मांस विक्रीवर संशयाने पाहिले जात होते. तसेच इतर राज्यातून होणारी कुत्र्यांच्या मांसाची खरेदी-विक्री धोकादायक असल्याने नागालँड सरकारने कुत्र्याच्याकच्चा आणि शिजवलेल्या मांसाच्या खरेदी-विक्रीवर बंदी आणली आहे. 

काही दिवसांपूर्वीच नागालँडमध्ये कुत्र्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर अनेक प्राणीप्रेमी संघटनांनीही त्याविरोधात आवाज उठवला होता.

Related Stories

अयोध्या : राम मंदिराच्या बांधकामास तूर्तास स्थगिती

datta jadhav

नागपूरची नाही तर धुळ्याची जागा बिनविरोध

Archana Banage

दिल्लीत लसीकरण मोहिमेला लागला ब्रेक; अनेक लसीकरण केंद्र देखील बंद : केजरीवाल यांची माहिती

Tousif Mujawar

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना 2 ऑक्टोबरपर्यंत दुबईमध्ये बंदी

Tousif Mujawar

सरकार पहिली परीक्षा पास

Patil_p

चार खलिस्तानींना हरियाणात अटक

Amit Kulkarni