Tarun Bharat

नाटोने ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडल्यास धडा शिकवू

Advertisements

रशियाच्या राष्ट्रपतींचा इशारा ः युक्रेनवर हल्ल्याची दाट शक्यता

वृत्तसंस्था/ मॉस्को

युक्रेनमध्ये नाटोने लक्ष्मणरेषा (रेड लाइन्स) ओलांडल्यास रशियाला नाईलाजास्तव प्रत्युत्तर द्यावे लागणार असल्याचा इशारा रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी दिला. तर अमेरिका आणि ब्रिटनने रशियाला युक्रेनच्या विरोधात सैन्य आक्रमकतेकरता इशारा दिला आहे.

सर्व घटक समजंसपणा दाखवतील अशी अपेक्षा आहे. पण युक्रेनशी संबंधित सुरक्षा मुद्दय़ांवर आमच्या चिंता असल्याचा इशारा नाटोला इशारा देऊ इच्छितो. युक्रेनच्या सीमेत जर घातक शस्त्रास्त्रs तैनात केल्यास मॉस्को 7-10 मिनिटांमध्ये हायपरसोनिक शस्त्रास्त्रs डागणार आहे. त्यानंतरच्या स्थितीची कल्पना केली जाऊ शकते असे मॉस्कोमध्ये आयोजित इन्व्हेस्टमेंट फोरमला संबोधित करताना पुतीन यांनी म्हटले आहे.

रशियाने अलिकडेच समुद्र आधारित हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या परीक्षणात यश प्राप्त केले आहे. सीमेजनीक मोठय़ा प्रमाणावर सैन्याभ्यास केले जात आहेत. अलिकडेच काळय़ा समुद्रावर सीमेपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर बॉम्बवर्षक विमानांनी उड्डाण केले, ही घातक अस्त्रs होती. आण्विक अस्त्रs देखील असू शकतात असे रशियाच्या राष्ट्रपतींनी म्हटले आहे. विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी नाटोवर सीमेनजीक शस्त्रास्त्रांना मोठय़ा प्रमाणावर तैनात केल्याचा आरोप केला.

तर युक्रेनच्या सीमेवर सैन्य तैनात वाढविण्याच्या मुद्दय़ावर वॉशिंग्टमध्ये आयोजित नाटोच्या बैठकीदरम्यान रशियाला कुठलेही नवे आक्रमक पाऊल न उचलण्याचा अथवा परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याचा इशारा देण्यात आला. रशियाची कुठल्याही प्रक्षोभक कारवाई अमेरिकेसाठी चिंताजनक असेल, कुठल्याही नव्या आक्रमक पावलाचे गंभीर परिणाम होतील असे अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी म्हटले. ब्रिटन आणि जर्मनी देखील अमेरिकेसोबत दिसून आले.

Related Stories

रशियात आढावा

Patil_p

युक्रेनला सध्या अमेरिकेची गरज

Patil_p

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये गोळीबार

Patil_p

जगातील पहिला रोबोट चित्रकार

Amit Kulkarni

पेरुतील धावपट्टीवर विमानाची ट्रकला धडक

Patil_p

सौदी अरेबियात पुरुषांवर निर्बंध

datta jadhav
error: Content is protected !!