Tarun Bharat

नाटय़ परिषदेतर्फे आज आदिनाथ पाटील यांचे गायन

प्रतिनिधी / बेळगाव

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या बेळगाव शाखेतर्फे शनिवार दि. 27 मार्च रोजी सरस्वती वाचनालय शहापूर येथे सायंकाळी 5.30 वा. नाटय़गीतांचा कार्यक्रम होणार आहे. गायक आदिनाथ पाटील हे नाटय़गीते सादर करणार असून कार्यक्रम सर्वांना खुला आहे.

आदिनाथ यांचा परिचय पुढीलप्रमाणे-

आदिनाथ हे चंदगड तालुक्मयातील किटवाड गावचे असून, प्रारंभी व्ही. एम. शिरसाट यांच्याकडून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. सध्या राहुल देशपांडे यांच्याकडे त्यांचे शिक्षण सुरू आहे. त्यांना त्यांचे भाऊ आकाश पाटील तबला साथ करणार आहेत.

आकाश पाटील

आकाश पाटील हे वयाच्या सहाव्या वर्षापासून तबला शिकत आहेत. त्यांचेही प्रारंभीचे शिक्षण व्ही. एम. शिरसाट यांच्याकडे झाले. पुण्याच्या निखिल पाचक यांच्याकडे त्यांचे शिक्षण सुरू आहे. सदर कार्यक्रमापूर्वी बेळगावचे रंगकर्मी कै. मनोहर बिर्जे यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. रसिकांनी कोविड नियमांचे पालन करून वेळेवर उपस्थित रहावे, असे कळविण्यात आले आहे.

Related Stories

एडिफाय स्पोर्ट्सची विजयी सलामी

Amit Kulkarni

स्पर्धेत यश

Patil_p

जलतरण तलावाचे काम रखडले

Amit Kulkarni

रिक्षांची रेलचेल, वाहतूक कोंडीची समस्या

Amit Kulkarni

आयटीआयमधील जीटीओंना नियुक्ती द्या

Amit Kulkarni

कोविड वॉरियर-शेट्टी फौंडेशनच्यावतीने अनेक ठिकाणी गरजूंना मदत

Amit Kulkarni
error: Content is protected !!