Tarun Bharat

नाभिक महामंडळाच्यावतीने काळ्या फिती लावून निषेध

Advertisements


वार्ताहर / आवळी बुद्रुक

गेली तीन महिने कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सलून व पार्लर दुकाने बंदचा आदेश महाराष्ट्र शासनाने काढला. एकतर शासन कोणत्याही प्रकारची मदत देण्यास तयार नाही व दुकाने उघडण्यास परवानगी देत नाही,या धर्तीवर राधानगरी तालुक्यातील सर्व सलून दुकानदार यांची उपासमार होत आहे.तरी सलून दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी व कर्नाटक सरकारच्या धर्तीवर प्रत्येक सलून व्यावसाईकांना १० हजार रुपये प्रत्येक महिना देण्याची घोषणा करावी अशी मागणी करण्यात आली.

राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्या आदेशानुसार विभागीय अध्यक्ष मारुती टिपुगडे व जिल्हा अध्यक्ष सयाजी झुंझार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व दुकानांच्या समोर काळ्या फिती लावून शासनाचा निषेध करन्यात आले. आंदोलनात तालुका अध्यक्ष पिंटू संकपाळ जिल्हा कार्यकारी चिटणीस कुमार शिंदे,जिल्हा संघटक दत्ताजी टिपुगडे,जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात टिपुगडे,तालुका सरचिटणीस विजय कोरे, तालुका उपाध्यक्ष कोंडीब टिपूगडे तालुक्यातील सर्व सलून व्यावसायिक सहभागी झाले होते.

Related Stories

बाधितांना नेणाऱया पथकावर दगडफेक

Patil_p

कोल्हापूर : पालकमंत्री बदलणे हे पंपावरचा माणूस बदलण्यासारखे आहे काय? – मंत्री सतेज पाटील

Abhijeet Shinde

CET परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

datta jadhav

कोल्हापूर जिल्हय़ात २४ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

हाथसर अत्याचाराचा निषेध करत गगनबावडा तालुक्यात रास्ता रोको

Abhijeet Shinde

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तलवारीची दादागिरी आता संपली आहे – मंत्री सामंत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!