Tarun Bharat

नायके-नेमार यांच्यातील करार रद्द

Advertisements

पॅरिस / वृत्तसंस्था

अमेरिकेच्या नायके कंपनीने ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू नेमारबरोबरचा करार रद्द केला आहे. या कंपनीच्या एका महिला कर्मचारीकडून नेमारची तक्रार आल्यानतंर हा निर्णय घेतला असल्याचा दावा द वॉल स्ट्रीट जर्नलने केला. नेमारच्या काही इव्हेंटसचे को-ऑर्डिनेशन करण्यासाठी व लॉजिस्टीक्सबाबत मदत करण्यासाठी सदर महिला त्याला भेटली. त्यावेळी नेमारने गैरवर्तणूक केल्याचे या वृत्तात म्हटले आहे. नेमारच्या प्रवक्त्याने सदर आरोप फेटाळून लावले आहेत. कंपनीने मात्र करार का रद्द केला, याचे कोणतेही कारण दिलेले नाही. नेमार व नायके यांच्यात ऑगस्ट 2020 मध्ये हा करार केला गेला होता.

नेमार सध्या टेरेसपोलीस येथे ब्राझील कॅम्पमध्ये असून जूनमधील दक्षिण अमेरिकन वर्ल्डकप क्वॉलिफायरसाठी तो संघासमवेत सराव करत आहे. हे ठिकाण रिओ डे जानेरिओपासून 120 किमी अंतरावर आहे.

Related Stories

T20 World Cup: भारताचा पहिला सामना पाकविरुद्ध; आयसीसीकडून वेळापत्रकाची घोषणा

Abhijeet Shinde

बोल्ट, मिल्ने, नीशमचे चेन्नईत आगमन

Patil_p

पाकिस्तानची उपांत्य फेरीत धडक

Patil_p

राधानगरी येथे गव्याच्या हल्ल्यात शेत मजूर महिला गंभीर जखमी

Abhijeet Shinde

शेवटच्या शर्यतीत भाग घेण्यास रोमेन ग्रोस्जेन उत्सुक

Patil_p

कोल्हापूर : पै.लव्हाजी साळुंखेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!