Tarun Bharat

नारायणराव जाधव प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्र मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत

बेळगाव

कोरोना महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजविला असून त्यातून आपला भारत देशही सुटलेला नाही. कोरोनाचा वणवा देशातील सर्व राज्यांना झळा पोहोचवीत असताना आपल्या महाराष्ट्र राज्याला तीव्र जाणीव करून देत आहे. दिवसागणिक बाधितांची संख्या वाढत असताना कोरोनाचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रशासकीय यंत्रणा दिवस-रात्र झटत आहे. त्याचवेळी बाधितांचे उपचार आणि पुनर्वसन करण्यासाठी बराच मोठय़ा प्रमाणात निधीची गरज आहे. अशावेळी महाराष्ट्र सरकारच्या मदतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्था, आर्थिक व धार्मिक संस्था,  उद्योजक व नागरिकांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. यासाठी आपल्याही प्रति÷ानने मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्याबद्दल मी वैयक्तिक आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने आभार व्यक्त करतो, असे गौरवोद्गार चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी काढले.

  नारायणराव जाधव प्रति÷ान शहापूर यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी बेळगावचे माजी उपमहापौर कल्लाप्पा प्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 या कार्यक्रमात प्रति÷ानचे अध्यक्ष मालोजी अष्टेकर, उपाध्यक्ष नेताजी जाधव व सेपेटरी बी. एस. जाधव यांच्या हस्ते चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री साहाय्यता निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी प्रति÷ानचे अध्यक्ष मालोजी अष्टेकर यांनी प्रति÷ानची माहिती देऊन उद्देश स्पष्ट केला.

 प्रास्ताविक बी. एस. जाधव यांनी केले. स्वागत उपाध्यक्ष नेताजी जाधव व श्रीधर जाधव यांनी केले. या कार्यक्रमास सभासद बाबासाहेब शिंदे, विजय जाधव, युवराज जाधव, पूजा जाधव, साईराज जाधव, सुमंत जाधव, ओवी जाधव इत्यादी उपस्थित होते.

Related Stories

बेळगावच्या हवामानाला व्हीव्हीपॅट नको

Patil_p

काहेरतर्फे महात्मा गांधी अध्ययन केंद्राचा शुधारंभ

Patil_p

जागतिक दर्जाची यकृत प्रत्यारोपण उपचार सुविधा

Patil_p

वैश्यवाणी समाजाचे प. पू. वामनाश्रम स्वामीजींचे स्वागत

Patil_p

विचित्र अपघातात आई-मुलगा ठार, दोघे जखमी

Amit Kulkarni

जलवाहिन्या घातलेल्या रस्त्यांची दुरुस्ती

Amit Kulkarni
error: Content is protected !!