Tarun Bharat

नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

Advertisements

बेळगाव / प्रतिनिधी

शहर परिसरात कार्तिक उत्सवानिमित्त विविध मंदिरात अभिषेक, होमहवन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थान मंदिरात सकाळी ज्ञानेश्वर अष्टेकर व मानकऱयांच्या हस्ते अभिषेक, सौ. व श्री. लक्ष्मी भाऊराव अष्टेकर दांपत्याच्या हस्ते होमहवन करण्यात आले. त्यानंतर सत्यनारायण पूजा सौ. व श्री. सरस्वती जोतिबा अष्टेकर यांच्या हस्ते पार पडली. यावेळी आरती करून तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.

  सालाबादप्रमाणे दरवषी कार्तिक उत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणारा महाप्रसाद यावषी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता. मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रम मंदिरापुरते मर्यादित करण्यात आले होते. सायंकाळी मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कोरोनाचे संकट लवकर टळू दे, अशी मागणी देवाकडे करण्यात आली. हा धार्मिक कार्यक्रम मोजक्मयाच जणांच्या उपस्थितीत पार पडला. 

Related Stories

यल्लम्मा डोंगरावर भाविकांचा जनसागर

Amit Kulkarni

सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

Amit Kulkarni

पिरनवाडी-किणये रस्ता बनला धोकादायक

Amit Kulkarni

अनधिकृत वसाहती अधिकृत करा

Omkar B

टायपिस्टच्या कन्येची युपीएससी-सीएमएस परीक्षेत गरुडझेप

Patil_p

रविवारी पावसाने घेतली उसंत

Amit Kulkarni
error: Content is protected !!