Tarun Bharat

नार्वेकर गल्ली जोतिबा मंदिरात आज कटल्याचे आगमन

प्रतिनिधी /बेळगाव

नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानात शनिवार दि. 2 रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कटल्याचे आगमन होणार आहे. सायंकाळी 4 वा. समादेवी मंदिरापासून नार्वेकर गल्लीपर्यंत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली जाणार आहे. याचबरोबर गुढीपाडव्यानिमित्त जोतिबा मूर्तीला अभिषेक करून पालखी पूजन केले जाणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावषी नार्वेकर गल्ली येथील जोतिबा देवस्थानपासून गुरुवार दि. 7 रोजी पायी पालखी निघणार आहे. सायंकाळी 4 वा. ही पालखी नार्वेकर गल्ली येथून जोतिबा डोंगराकडे मार्गस्थ होणार आहे. हेब्बाळ, संकेश्वर, निपाणी, कागल, कोल्हापूर येथे मुक्काम करत 12 रोजी जोतिबा डोंगरावर पालखी पोहोचणार आहे. शुक्रवार दि. 15 रोजी रात्री दवणा, दि. 16 रोजी पालखी सोहळा, गुरुवार दि. 21 रोजी बेळगाव कोल्हापूर सर्कल येथे आंबिल घुगऱयाची जत्रा करून पालखी पुन्हा नार्वेकर गल्ली येथे मंदिरात येणार आहे. ज्या भाविकांना या पायी पालखीमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी नाना अष्टेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Related Stories

तुरमुरी ग्रा. पं. अध्यक्षपदी वैशाली खांडेकर यांची निवड

Amit Kulkarni

इंदिरा कॅन्टीनला अल्पप्रतिसाद

Amit Kulkarni

जायचे होते कोप्पळला… पोहोचले बेळगावात!

Amit Kulkarni

बेळगाव स्पोर्ट्स क्लब, जिमखाना संघ विजयी

Amit Kulkarni

खानापूर रोडवर वृद्ध दाम्पत्याला लुटले

Amit Kulkarni

बुडाला जमिनी देण्यास शेतकऱयांचा विरोध

Patil_p