Tarun Bharat

नार्वेकर गल्ली येथील जोतिबा मंदिरात वैष्णोदेवीची स्थापना

बेळगाव /प्रतिनिधी

दरवषी नवरात्रीनिमित्त नार्वेकर गल्ली येथील जोतिबा मंदिरात वैष्णोदेवीची स्थापना करण्यात येते. यंदाही मंदिरात वैष्णोदेवीची स्थापना करण्यात आली आहे. या नवरात्रोत्सव काळात मंदिरात दररोज केदारविजय ग्रंथाचे पठण करण्यात येत आहे. यंदा सप्तमी व अष्टमी एकाच दिवशी आल्यामुळे शुक्रवार दि. 23 रोजी मंदिरात देवीचा व जोतिबा देवाचा अहोरात्र जागर करून 108 केदार कवच जप म्हणण्यात येणार आहे.

  याबरोबरच खंडेनवमी दिवशी शस्त्रपूजा, दसऱयादिवशी मंदिरापुरती मर्यादित पालखी पूजा करून जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे, अशी प्रार्थना करण्यात येणार आहे. दरवषी जोतिबाची पालखी बसवाण गल्लीतील लक्ष्मी मंदिराला भेट देते. पण यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे मंदिरातच पालखी पूजन करण्यात येणार आहे. हे सर्व मंदिरातील धार्मिक कार्यक्रम मंदिरापुरते मर्यादित असणार आहेत.

Related Stories

गौरव देसाई राऊंड टेबल चेअरमनपदी

Amit Kulkarni

कणबर्गी येथील गटार बांधकाम पूर्ण करण्याची मागणी

Omkar B

उचगाव परिसरातून बंदला प्रतिसाद

Amit Kulkarni

विजया हॉस्पिटलतर्फे औषधांचे वितरण

Patil_p

शहरात पार्किंगचे वाढले महत्त्व

Amit Kulkarni

सुभेदार मेजर मनोहर मिराशी यांना अखेरचा सलाम

Amit Kulkarni