Tarun Bharat

नावेली अपघातात 1 ठार, चालकाला अटक

प्रतिनिधी / मडगाव

मांडप -नावेली येथील एका जंक्शनजवळ रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात सिल्वेस्टर फर्नाडिस हा 66 वर्षीय इसम जागीच ठार झाला. या अपघाताला कारणीभूत ठरलेला आरोपी निसार आलम हुसैन (30) याला अटक करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार मालभाट मडगाव येथील मेसर्स दामोदर गॅस लिमीटेड या स्वयंपाक गॅस वितरण कंपनीचा मांडप नावेली येथील शनि मंदिराजवळ  गोदाम आहे. जीए-02-यु-5126 क्रमांकाची स्वयंपाक गॅस डेलीव्हरी करणारी पिकअप या गोदामाहून नावेलीच्या दिशेने येत असताना जंक्शनजवळ विरुद्ध दिशेने येत असलेल्या एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली.

ही धडक जबरदस्त होती. शनि मंदिराजवळ राहात असलेल्या दुचाकीस्वार सिल्वेस्टर फर्नाडिस याला या पिकअपने सुमारे दोन मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले आणि नंतर आरोपी घटनास्थळाहून फरारी झाला.

ही घटना घडली त्यावेळी तेथे एक माहिला होती. तिने ही बाब मडगाव पोलिसांना सविस्तर सांगितली. त्यानंतर गंभीररित्या जखमी झालेल्या फर्नाडिस याला ऍम्बुलन्सने मडगावच्या सरकारी इस्पितळात नेण्यात आले तेव्हा डय़ुटीवर असलेल्या डॉक्टरांनी फर्नाडिस यांना मृतावस्थेत आणले अशी नोंद केली.

घटना घडल्यानंतर फरारी झालेल्या मूळ कथिहार, बिहार राज्यातील व सध्या मोड्डी-नावेली येथे राहात असलेला निसार आलम हुसैन याला नंतर मडगाव पोलिसांनी अटक केली. निष्काळजीपणे वाहन चालवून या अपघाताला कारणीभूत ठरल्याच्या कारणास्तव पोलिसांनी निसार आलम हुसैन याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 279, 304-अ तसेच जखमी व्यक्तीवर उपचार न केल्याच्या आरोपावरुन मोटर वाहन कायदा 1988 च्या 134 -अ, ब कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.

Related Stories

डॉ. सोमनाथ कोमरपंत यांच्या छळाचा दावा तथ्यहीन

Amit Kulkarni

‘महाकाल’च्या लोकार्पणाप्रित्यर्थ फोंडा भाजपातर्फे शिव आराधना

Amit Kulkarni

दिल्लीतील ठकसेनाला अटक

Patil_p

‘तुमची याचिका फेटाळली’

Amit Kulkarni

जागतिक योगदिनी ऑनलाईन ‘योग’ जुळून आला..

Omkar B

स्कॉट नेव्हीलच्या गोलमुळे ईस्ट बंगालने केरळ ब्लास्टर्सला रोखले

Amit Kulkarni