Tarun Bharat

नाव नाही ते गाव, कर्नाटक सरकारचा अजब कारभार

हुक्केरी तालुक्यातील प्रकार

वार्ताहर/संकेश्वर

1968 पंचायत कायद्यानुसार अद्याप वल्लभगड गावचे नाव कर्नाटक च्या कोणत्याही दप्तरात नोंद नाही.वल्लभगड गाव हे ऐतिहासिक वल्लभगड किल्याच्या नावावरुन ठेवले आहे.1942 मधला या गावचा उल्लेख असलेला पेपर शंकराचार्य मठ संकेश्वर व संस्थान मठ निडसोशी येथे मिळाला आहे.मुंबई व बेळगाव गॅजेटमध्येही या वल्लभगड गावचा उल्लेख सापडला आहे.

2017 या साली वल्लभगड गावचे नाव कर्नाटक च्या दप्तरात नोंदवण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव पास करून जिल्ह्याधिकारी यांना पाठवला होता. पण 2019 मध्ये अप्पर जिल्ह्याधिकारी बेळगाव यांनी तो ठराव अमान्य असल्याचे सांगितले होते.

सध्या या वल्लभगड गावात ग्रामपंचायत आहे. या पंचायतीचे नाव हरगापूर असे आहे . हरगापूर हे गाव वल्लभगड गावापासून 2 कि. मी अंतरावर आहे . मध्यंतरी या गावाला हरगापूरगड असे म्हणायचे नोंद तर कुठेच नाही. ग्रामपंचायत व सरकारी वेबसाईटवर हरगापूर या एकाच गावची नोंद आहे. त्यामुळे वल्लभगड गाव गेल कुठं असा सवाल गावातील नागरिक करीत आहेत. पंतप्रधान, मुख्यमंत्री, जिल्ह्याधिकारी व स्थानिक आमदारांनी या वल्लभगड गावचे नाव लवकरात लवकर नोंद करून घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Stories

मंगळवारपेठेत जनावरे दगावण्याचा प्रकार सुरूच

Amit Kulkarni

बेनकनहळ्ळी क्रॉस-सावगाव रस्त्याचे डांबरीकरण

Amit Kulkarni

कॅलिफोर्निया विद्यापीठात भारताचा तिरंगा

Patil_p

मराठा मंदिरमधील गार्मेंट सेलचा आज शेवटचा दिवस

Amit Kulkarni

मनपा निवडणूक पुन्हा घ्या

Amit Kulkarni

रोहयोंतर्गत काम उपलब्ध करा : जि. पं. अधिकाऱ्यांना निवेदन

Amit Kulkarni