Tarun Bharat

नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर

नाशिक \ ऑनलाईन टीम

नाशिकमध्ये बुधवारी सकाळी घडलेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेमध्ये तब्बल २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. राज्याचे अन्नपुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. बुधवारी दुपारी छगन भुजबळ यांनी घटनास्थळाला भेट दिली यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

छगन भुजबळ म्हणाले की, ही अतिशय दु:खद घटना आहे. कोरोनाशी लढा सुरू असताना अशी दुर्घटना होणं हे अतिशय दुर्दैवी आहे. दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारकडून ३ सदस्यीय समितीची स्थापना केली असून यामध्ये एक आयएएस अधिकारी, एक इंजिनिअर आणि एका डॉक्टरचा समावेश आहे.

ऑक्सिजन कसा लीक झाला याची चौकशी करणाऱ्या समितीमध्ये एक इंजिनिअर देखील मुख्यमंत्र्यांनी ठेवला आहे. याची चौकशी झाल्याशिवाय दोषी ठरवता येणार नाही. पण ते शोधणं गरजेचं आहे. त्यासाठी याची उच्चस्तरीय समितीच्या मार्फत चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत असं भुजबळ यावेळी म्हणाले.

Related Stories

मिरजेत चिमुकल्यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन

Archana Banage

विद्यापीठांच्या कोणत्याही परीक्षा रद्द नाहीत

prashant_c

युवराज संभाजीराजेंचा ‘डबल बार’ ! सर्वपक्षीयांची गरज अन् कोंडीही

Rahul Gadkar

अपघातग्रस्त दाम्पत्याची पालकमंत्र्यांनी केली चौकशी

Patil_p

हेलिकॉप्टर दुर्घटनेसाठी भारतीय लष्करातील त्रुटी जबाबदार; चीनचा कांगावा

datta jadhav

पुणे : कोरोना चाचण्या वाढविण्यासोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्या

Tousif Mujawar