Tarun Bharat

नाशिक पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना सुट्टी द्यावी : आ. गोपीचंद पडळकर

आटपाडी / प्रतिनिधी

नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना पोलीस उपनिरीक्षकांना 11 महिन्यांच्या कालावधीत एकही सुट्टी देण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील 750 प्रशिक्षणार्थींना अनेक कारणे व अडचणी असतानाही सुट्टीवर जाता आलेले नाही. राज्य सरकारने त्यांना आठ दिवसाची तात्काळ सुट्टी द्यावी, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

7 जानेवारी ते 6 जानेवारी या कालावधी साठी सुमारे 750 प्रशिक्षणार्थी पीएसआयचे प्रशिक्षण घेत आहेत. कोरोनामुळे प्रशिक्षण कालावधीत वाढ झाली असून मार्च 2021 पर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे. आत्तापर्यंत 11 महिन्यांच्या कालावधीत एकही सुट्टी येथील उपनिरीक्षकांना मिळाली नाही. त्यामुळे या प्रशिक्षणार्थींच्या मनात कैदी असल्याची भावना निर्माण होऊ नये, म्हणून त्यांना आठ दिवसाची सुट्टी द्यावी, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.

Related Stories

बोगस जमीन व्यवहार प्रकरणी दोघांना अटक

Archana Banage

पालिकेच्या आरोग्य विभागात खांदेपालट होणार कधी?

Patil_p

मोठी कारवाई : आसाममध्ये तब्बल 100 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Abhijeet Khandekar

सांगली : अमेरिकेतील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.साहू यांची आरआयटीला भेट

Archana Banage

बाळासाहेब थोरातांनी घेतली शरद पवारांची भेट

Archana Banage

जिल्हा परिषदेसमोर अन्यायकारक जीआरची उद्या होळी..

Archana Banage