Tarun Bharat

नाशिक शहरात कोरोनाचा पहिला बळी

ऑनलाईन टीम / नाशिक : 

नाशिक शहरात तीन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या महिलेचा कोरोना रिपोर्ट आज सकाळी आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला असून, तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ही महिला नाशिक शहरातील पहिली कोरोनाबळी ठरली आहे. 
 

मृत महिला मूळची उत्तरप्रदेशची असून, ती 2 वर्षांपासून पतीसोबत नाशिक शहरातील बजरंग वाडी येथे वास्तव्यास होती. शनिवारी सायंकाळी तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोनाची लक्षणे वाटल्याने रुग्णालयाने तिचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला होता. त्यानंतर दोन तासातच या महिलेचा मृत्यू झाला. आज सकाळी आरोग्य प्रशासनाला महिलेचा रिपोर्ट मिळाल्यानंतर ही बाब समोर आली. या महिलेच्या मृत्यूने नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 13 वर पोहचली आहे.

Related Stories

लॉकडाऊनमुळे कोरोनाचा गुणाकार कमी करण्यात आपण यशस्वी

prashant_c

रुग्णालयातून पळाले 24 कोरोना संशयित

prashant_c

महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपी, पूल टेस्टिंगला केंद्र सरकारची परवानगी

prashant_c

एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावीला अटक, पुणे पोलिसांची कार्यवाही

Archana Banage

महाराष्ट्रात 2933 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

पिंपरी चिंचवडची चिंता वाढली; एकाच दिवशी सहा कोरोना पॉझिटीव्ह

prashant_c