Tarun Bharat

‘नासा’कडून व्हेंटिलेटरची निर्मिती

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

‘नासा’ या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने कोरोना रुग्णांसाठी विशेष व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे. न्यूयॉर्कमधील इकान स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये मागील आठवड्यात या व्हेंटिलेटरची चाचणी यशस्वी झाली.

 व्हेंटिलेटर इंटरव्हेन्शन टेक्नॉलॉजी ॲक्सेसिबल लोकली (व्हायटल) असे या व्हेंटिलेटरला नाव देण्यात आले. हा विशेष उच्चदाबयुक्त व्हेंटिलेटर आहे. खास कोविड -19 रुग्णांसाठी हा व्हेंटिलेटर तयार करण्यात आला आहे. नासाने सध्या वापरत असलेल्याच सुट्या भागांचा वापर यामध्ये केला आहे.

 नासाचे व्हायटल हे नेहमी वापरण्यात येत असलेल्या व्हेंटिलेटरला पर्याय नाही. नासाचे व्हेंटिलेटर चार महिन्यांपुरतेेेच काम करेल. अन्य व्हेंटिलेटरचे आयुष्य साधारणपणे चार ते पाच वर्षे असते.  आपत्कालीन काळात व्हायटल च्या व्यावसायिक उत्पादनाला सरकारकडून परवानगी मिळण्याची अपेक्षा नासाला आहे, असे नासाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

प्रख्यात स्त्रीवादी लेखिका कमला भसीन यांचे निधन

datta jadhav

पत्रकार परिषदेत का रडले चंद्राबाबू नायडू, नेमकं कारण काय?

Abhijeet Shinde

दिल्ली सरकारची पद्म पुरस्कारासाठी शिफारस; केंद्राकडे पाठवली तीन डॉक्टरांची नावे

Rohan_P

धक्कादायक ! नाशिकमध्ये दोन बहिणींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Rohan_P

12 वर्षांवरील मुलांसाठी लस तयार; फायझरने मागितली केंद्राकडे फास्ट ट्रॅक मंजुरी

Rohan_P

राऊतांवरील कारवाईमुळे आम्ही आनंदी; बंडखोर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

datta jadhav
error: Content is protected !!