Tarun Bharat

ना डरेंगे; ना झुकेंगे! चौकशी सुरू असतानाच मलिकांच्या ट्विटर हँडलवरुन सूचक इशारा

ऑनलाईन टीम / मुंबई :

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक यांची आर्थिक गैरव्यवहार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत जमीन व्यवहार केल्याप्रकरणी ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू असतानाच मलिक यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक सूचक इशारा देण्यात आला आहे.

या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘ना डरेंगे, ना झुकेंगे, Be ready for 2024!’

या ट्विटमधून मलिक यांनी असे सूचित केले आहे की, आम्ही केंदीय तपास यंत्रणांच्या कारवायांना घाबरणारे नाही. तसेच अशा कारवायांपुढे झुकणारही नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयार आहोत.

आज पहाटे साडेचारच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी सीआरपीएफच्या पथकासह नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील नूर मंजील या निवासस्थानी छापा टाकला. त्यानंतर ईडीने त्यांना सकाळी 7.30 वाजता ईडी कार्यालयात नेले. सकाळी 7.45 वाजल्यापासून मलिकांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांच्याकडून ईडी आणि बॅलार्ड पिअर येथील पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलनाला सुरू आहे.

Related Stories

सातारा : दूध उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात अनुदान मिळावे

Archana Banage

“जे म्हणायचे माता गंगेने बोलावले आहे, त्यांनीच गंगेला रडवले”

Archana Banage

हातकणंगलेत मतदान प्रक्रिये संदर्भात पहिले प्रशिक्षण शिबिर संपन्न

Archana Banage

सातारचा किरण भगत स्पर्धेबाहेर

datta jadhav

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट

Archana Banage

पालघर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला नोटीस

Tousif Mujawar