Tarun Bharat

निकोल किडमॅनसोबत संवाद साधणार हुमा

महिलांच्या मुद्दय़ांवर होणार संभाषण

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशीने हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री निकोल किडमनसाब्sात होणाऱया चर्चेची अधिकृत घोषणा केली आहे. तिच्या या चॅट शोला ऑस्ट्रेलियातील एका आघाडीच्या कंपनीकडून आयोजित केले जात असून यात निकोल किडमन आणि हुमा महिलांचे आरोग्य, आनंदी जीवनावरून संवाद साधताना दिसून येतील.

हुमाने या चॅट शोची माहिती इन्स्टाग्रामवर एक छायाचित्र अन् पोस्टर शेअर करत दिली आहे. पोस्टरमध्ये एकीकडे निकोल तर दुसऱया बाजूला हुमा दिसून येत आहे. जगप्रसिद्ध अभिनेत्री निकोल किडमनसोबत संवाद साधणार आहे. आम्ही महिलांचे आनंदी जीवन अन् आरोग्यावरून चर्चा करणार आहोत असे हुमाने म्हटले आहे.  या पोस्टनंतर राजकुमार रावची पत्नी पत्रलेखा, अभिनेत्री डायना पेंटीने हुमाचे अभिनंदन केले आहे.

हुमा अलिकडेच ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ या चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. हुमा लवकरच पियुष गुप्ता यांच्या दिग्दर्शनात तयार ‘तरला’ चित्रपटातून झळकणार आहे. तसेच संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरा मंडी’मध्ये ती महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

Related Stories

हॉलिवूडची ‘गोल्डन गर्ल’ बेट्टी व्हाइटचे निधन

Patil_p

चित्रपटासाठी 19 वर्षे संशोधन

Patil_p

पॉप सिंगर रिहानाला पुत्ररत्न

Patil_p

स्वरा भास्कर म्हणाली , “गांधीजींचे मारेकरी आजही जिवंत”

Archana Banage

आमिरसोबत काम करणार नागार्जुनचा पुत्र

Patil_p

विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील विद्यापीठ हरपलं

datta jadhav