Tarun Bharat

निखत झरीन उपांत्यपूर्व फेरीत

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

विद्यमान विजेती निखत झरीनने स्ट्रन्जा स्मृती मुष्टियुद्ध स्पर्धेच्या 51 किलोग्रॅम वजनगटात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सोफिया, बल्गेरिया येथे ही स्पर्धा सुरु आहे. प्रतिस्पर्धी सेव्हदा ऍसेनोव्हाने माघार घेतल्यानंतर निखत झरीन आगेकूच करेल, हे स्पष्ट झाले. स्थानिक फेवरीट खेळाडू ऍसेनोव्हा ही या स्पर्धेतील विद्यमान सुवर्णजेती होती.

पुरुष गटात दुर्योधन सिंग नेगी (69 किलोग्रॅम) व मोहम्मद हुस्सामुद्दीन (57 किलोग्रॅम) यांनी सलामीचे सामने जिंकले. सिंगने पोलंडच्या मॅटेस्झ पोल्स्कीला तर हुस्सामुद्दीनने फ्रान्सच्या इन्झोला चीत केले. पुरुष गटातील अन्य लढतीत अंकित खताना (75 किलो), आशियाई रौप्यजेती दीपक कुमार (52 किलो), नरेंदर (91 किलोवरील), नवीन कुमार (91 किलो) व महिला गटात नुपूर (75 किलो), ललिता (69 किलो) यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

Related Stories

न्यूझीलंडचा नील वॅग्नर दुसऱया कसोटीतून बाहेर

Patil_p

मुंबई संघाचे नेतृत्व पृथ्वी शॉकडे

Patil_p

मिताली राज ‘दस हजारी’ मनसबदार

Patil_p

बोपण्णा-रामकुमार, सानिया मिर्झा उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

जर्मनीचा व्हेरेव्ह अंतिम फेरीत

Patil_p

स्कॉटलंडचा बांगलादेशला पराभवाचा धक्का!

Patil_p
error: Content is protected !!