Tarun Bharat

युकेवरून आलेले प्रवासी १३८ सापडले

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक सरकारने कोरोना चाचणी अहवालाशिवाय यूकेमधून राज्यात आलेल्या १३८ प्रवाश्यांचा यशस्वीरित्या शोध घेतला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी बुधवारी दिली.

सुमारे २५०० आंतरराष्ट्रीय प्रवासी २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान यूकेमधून कर्नाटकात दाखल झाले होते. मात्र, यापैकी १३८ जण १९ आणि २० डिसेंबर रोजी यूकेमधून परतलेले नकारात्मक कोरोना प्रमाणपत्र नव्हते.

या सर्व १३८ प्रवाश्यांचा शोध घेण्यात आला असून त्यांचे नमुने संकलित करण्यात आले असल्याचे सुधाकर यांनी सांगितले.
मंत्री सुधाकर यांनी आम्ही त्यांच्या कोरोना चाचणी निकालाची वाट पाहत आहोत. दरम्यान गोळा केलेले नमुने बेंगळूर मधील निमहन्स, नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, आयआयएससी किंवा नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, बेंगळूर फील्ड युनिट या चार प्रयोगशाळांपैकी एका प्रयोग शाळेला पाठवले जातीलअसे ते म्हणाले.
या अनुक्रमेची किंमत राज्य सरकार वहन करेल आणि प्रवाशांना त्यासाठी पैसे देण्याची गरज नाही. निकाल दोन ते तीन दिवसात उपलब्ध होतील,” असे ते म्हणाले. याशिवाय यापूर्वी यूकेमधून परत आलेल्यांच्या आरोग्याच्या स्थितीवर आरोग्य विभाग नजर ठेवून आहे.

गेल्या दोन आठवड्यांत कर्नाटकात ज्यांचे आगमन झाले आहे त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देखरेख ठेवली जात आहे. २५ नोव्हेंबरपासून पहिल्या दोन आठवड्यात जे लोक आले आहेत त्यांना स्वत: घरी देखरेख करावी लागेल., असे डॉ सुधाकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान जगाच्या कोणत्याही भागावरून येणार्‍या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी कोरोनाचे नकारात्मक प्रमाणपत्र घेऊन आले पाहिजे जे २४ तासापेक्षा जुने नाही किंवा विमानतळावर येताना चाचणी घ्यावी. आंतरराज्यीय प्रवासावर बंदी नाही, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

…अन् विमानाचा फुटला टायर

Archana Banage

आरोग्यमंत्र्यांचे कोरोनामुक्त रुग्णांना ‘टीबी’ची तपासणी करण्याचे आवाहन

Archana Banage

व्ही. पोन्नराजू मुख्यमंत्र्यांचे नवे सचिव

Amit Kulkarni

बेंगळूर: बेकायदेशीरपणे ‘ब्लॅक फंगस’ औषधांची विक्री करताना अभियंत्यास अटक

Archana Banage

सेक्स व्हिडिओ प्रकरण : १०० कोटी रुपयांचा सौदा अयशस्वी झाल्याची एसआयटीला माहिती

Archana Banage

बेंगळूर: शासकीय मेडिकल कॉलेजला आता वाजपेयीचं नाव

Archana Banage