Tarun Bharat

निजगुणानंद स्वामींना धमकी देणाऱयांवर कारवाई करा

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

बैलूर मठाचे स्वामी निजगुणानंद स्वामीजी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. समाजाला मार्गदर्शन करत असताना अशाप्रकारे धमकी दिली जात आहे. तेव्हा धमकी देणाऱयांवर कारवाई करा तसेच मठाधीशांना संरक्षण द्या, अशी मागणी लिंगायत महासभा आणि राष्ट्रीय बसव सेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

स्वामी निजगुणानंद यांना यापूर्वीही धमक्मया आल्या होत्या. अशा धमक्मया वारंवार येत आहेत. तरी त्यांचा बंदोबस्त करा, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शंकर गुडस, अरविंद परुशट्टी, ऍड. बसवराज रोट्टी, अशोक मळगली, राजू कुंदगोळ, आर. एस. दर्गे, ऍड. बी. पी. जेवणी, सदानंद बसट्टी, शिवानंद मेटय़ाळ, राजू मगदूम यांच्यासह लिंगायत समाजातील नागरिक उपस्थित होते.  

error: Content is protected !!