Tarun Bharat

नितीन कुंकळय़ेकर सलग तिसऱयांदा मेटच्या अध्यक्षपदी

Advertisements

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यातील आयटी उद्योगातील प्रसिद्ध असलेले नितीन कुंकळय़ेकर यांची सलग तिसऱयांदा अखिल भारतीय आयटी उद्योजकांची शिखर संघटना असलेल्या मेट या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

नवी दिल्ली येथून ही निवड जाहीर करण्यात आली असून हरिकृष्णन आणि राजकुमार ऋषी यांची या संघटनेच्या उपाध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली. मेट ही भारतातील आयटी उद्योग आणि संगणक हार्टवेअर उत्पादकांची शिखर संघटना आहे.

केंद्र सरकारबरोबर उद्योग धोरण तयार करण्यात तिचा महत्वचा सहभाग असतो. सध्या कोरोना महामारीमुळे आलेल्या मंदीच्या काळात हा उद्योग पुढे नेण्याचे आपल्यासमोर आव्हान असून यासाठी योग्य धोरण तयार करून या उद्योगाला उर्जितावस्था आणून देण्याचे आपले प्रयत्न असतील, असे पुंकळय़ेकर यांनी सांगितले.

Related Stories

भरदुपारी ज्वेलरचा गोळी झाडून, भोसकून खून

Patil_p

कोरोनाचे दोन नवे रुग्ण

Omkar B

पर्यटकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

Amit Kulkarni

लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी हरमल शाखेतर्फे शिक्षकांचा सत्कार

Amit Kulkarni

पेडणे मतदारसंघातच नोकऱया मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होणार

Amit Kulkarni

काँग्रेसने सत्तास्थापनेची स्वप्ने पाहू नये

Omkar B
error: Content is protected !!