Tarun Bharat

नितीन गडकरींनी सांगितली कामं करून घेण्याची त्यांची पद्धत!

 पुणे/प्रतिनिधी
Advertisements

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामाचं भूमिपूजन आज नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी गडकरींनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. प्रशासनाकडून मोठमोठी कामं वेगाने कशी करून घ्यायची, याविषयी गडकरींनी यावेळी बोलताना टिप्पणी केली.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या वेगवान कामासाठी आणि वेगवेगळ्या कल्पनांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. तसेच प्रशासनाकडून काम करून घेण्यामध्ये नितीन गडकरींचा हातखंडा आहे. पण गडकरी ही कामं प्रशासनाकडून कशी करून घेतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचंच उत्तर गडकरींनी पुण्यात उड्डाणपुलाच्या कामाचं भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना दिलं आहे.

गडकरींनी पुण्यातील नदी विकास प्रकल्पाच्या कामाबद्दल एक आठवण यावेळीसांगितली. “पुण्यातील नदी विकास प्रकल्प जवळपास १४०० कोटींचा आहे. त्या प्रकल्पावर दिल्लीत चर्चा झाली. पण तो अडकून पडला होता. तेव्हा शेतकरी जसा बैलांच्या मागे तुतारी घेऊन लागतात, तसं सरकारमध्ये प्रशासनाच्या मागे तुतारी घेऊन राहिलं, तर त्याचंच काम होतं, बाकीच्यांचं होत नाही. त्या वेळी मी सचिवांना या कामाची तातडीनं कंत्राटं काढण्याचे निर्देश दिले. आता जायकाचे १४०० कोटींचे टेंडर निघाले आहेत आणि काम देखील सुरू झालं आहे”, असं गडकरी यावेळी म्हणाले.

Related Stories

नोएडा : चार वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण

Rohan_P

चारधाम यात्रेवरील बंदी उठवली

datta jadhav

संयुक्त किसान मोर्चाची 26 जूनला राजभवनांसमोर निदर्शने

datta jadhav

घरपट्टी, पाणीपट्टी माफ करा शहर शिवसेनेची मागणी

Patil_p

सांगलीच्या जतमध्ये भूकंपाचे धक्के, तीव्रता ४.५ रिश्टर स्केल

Rahul Gadkar

दुबार संसर्गाचा धोका बळावला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!