Tarun Bharat

नितीन गडकरी, अरविंद केजरीवाल आज गोव्यात

प्रतिनिधी /पणजी

केंद्रीय अवजड वाहतूकमंत्री नितीन गडकरी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दोन्ही नेते आज सोमवार दि. 1 नोव्हेंबर रोजी गोव्यात येत असून आपापल्या पक्ष पदाधिकाऱयांशी ते विचार विनिमय व मार्गदर्शन करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची गोवा भेट महत्त्वाची मानली जात असून पक्षाची रणनिती ठरविण्याची शक्यता आहे.

मंत्री गडकरी आज सकाळी 10.30 वा. गोव्यात पोहोचणार असून केजरीवाल हे दुपारी 2 वा. येणार आहेत. दोन्ही नेत्यांचा अधिकृत असा कोणताही कार्यक्रम ठरलेला नाही की जाहीरही करण्यात आलेला नाही. ते दोन्ही नेते पक्षाचे गोव्यातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी बैठका घेणार असून विधानसभा निवडणुकीची तयारी करणार असल्याचे सांगण्यात आले. केजरीवाल यांचा सिदाद गोवा दोनापावला येथे मुक्काम असून ते मंगळवारी दुपारी 2 वाजता माघारी फ्ढिरणार आहेत. गडकरी केव्हा परत जाणार हे निश्चित कळलेले नाही.

‘टेलेमेडीसीन’चा आज गोमेकॉत शुभारंभ

गोमेकॉत स्थापन करण्यात आलेल्या ‘टेलेमेडीसीन’ योजनेचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवार, दि. 1 नोव्हेंबर रोजी शुभारंभ करण्यात येणार आहे. गोमेकॉतील ऑडीटोरीयममध्ये दुपारी 12.30 वा. होणाऱया या कार्यक्रमास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. या योजनेतून रुग्णांना त्यांच्या विविध आजारांवर डॉक्टर्सकडून सल्ला देण्यात येणार आहे. टेलेमेडीसीन ही नवीन संकल्पना असून ती आता देशभरात विविध राज्यात राबविण्यात येणार आहे.

Related Stories

उचगाव नेम्मदी केंद्रामधील भ्रष्टाचारामुळे गोरगरिबांची पिळवणूक

Patil_p

श्रीक्षेत्र पिंगुळीचे संत विनायक अण्णा राऊळ महाराज मूर्तीस्थापना सोहळा आजपासून

Amit Kulkarni

शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षण संस्थांना विश्वासात घ्या

Omkar B

साटरे डोंगराळ भागातून गढूळ पाण्याचा प्रवाह

Amit Kulkarni

म्हार्दोळ येथे आज ‘स्वर्गीय स्वरांना स्वरांजली’ कार्यक्रम

Amit Kulkarni

पर्यटनमंत्र्यांची पैंगीणच्या परशुराम वसतीगृहास सदिच्छा भेट

Amit Kulkarni