Tarun Bharat

नितीशकुमार उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

ऑनलाईन टीम / पाटणा : 

बिहारमध्ये NDA च्या सरकारचा शपथविधी उद्या (सोमवारी) दुपारी 4.30 वाजता होणार आहे. नितीशकुमार हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असून, उपमुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेन्स कायम आहे. उद्याच चर्चा करून उपमुख्यमंत्री ठरवण्यात येणार असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. 

NDA च्या विधिमंडळाचे नेते म्हणून निवडून आल्यानंतर नितीशकुमार यांनी मुख्यमंत्री न होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, भाजपच्या आग्रहाखातर त्यांनी हे पद स्वीकारले आहे. त्यानंतर त्यांनी राजभवनात सरकार स्थापनेचा दावाही केला आहे. राज्यपालांनीही त्यांना सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण दिले आहे.

जनता दल युनायटेडचे अध्यक्ष असलेले नितीशकुमार आता चौथ्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. 

Related Stories

बँक कर्मचाऱ्यांच्या फॅमिली पेन्शनमध्ये वाढ

Patil_p

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 8 लाखांवर

datta jadhav

चीनविरोधात क्वाडचे सदस्य देश एकजूट

Patil_p

पाळीव श्वानांसोबत मुलांचा विशेष ताळमेळ पॉग्नँट संस्थेचा दावा

Patil_p

Election 2022 : राज्य सरकारचा निर्णय: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017 प्रमाणेच

Abhijeet Khandekar

आरोग्यमंत्र्यांचे कोरोनामुक्त रुग्णांना ‘टीबी’ची तपासणी करण्याचे आवाहन

Archana Banage