Tarun Bharat

नितीश कुमार फक्त सत्तेत राहून आपलं आयुष्य घालवताहेत- तेजस्वी यादव

ऑनलाईन टीम/तरुण भारत

आरजेडी (RJD) चे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी राज्यातील वाढत चालेल्या गुन्हेगारीवरून सत्ताधारी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच तेजस्वी यादव (Tejashwi Yadav Leader of Opposition of Bihar) त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची वयावरून खिल्ली देखील उडवली आहे.

तेजस्वी यादव यांनी राज्यात वेगानं वाढणारी महागाई आणि गुन्हेगारीवरून पुन्हा एकदा बिहार सरकारवर हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांच्या वयाची खिल्ली उडवत त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधलाय. ते म्हणाले, नितीश कुमार फक्त सत्तेत राहून आपलं आयुष्य घालवत आहेत. त्यांना बिहारच्या (Bihar) जनतेची कोणतीही चिंता नाहीय. त्यांना साथ देणारा भाजपही नितीश कुमारांचीच पालखी वाहत आहे, असा घणाघात तेजस्वींनी नितीश कुमारांवर केलाय.

तेजस्वी यांनी ट्विट केलं असून त्यांमध्ये, बिहारमध्ये महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दा गंभीर बनला आहे. नितीश कुमार सरकारमुळं प्रत्येक क्षेत्रात अडचणी वाढत आहेत. पण, त्यांना याचं काहीच देणं-घेणं नाही. मुख्यमंत्री फक्त सत्तेत राहून आपलं आयुष्य घालवत आहेत आणि कमकुवत भाजप त्यांची पालखी वाहत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

तेजस्वी यादव यांनी महागाई आणि बेरोजगारी मुद्द्यावरून बिहार आणि मोदी सरकार चांगलीच टीका केली आहे. ते म्हणाले, 2020 च्या विधानसभा निवडणुकीत 19 लाख लोकांना नोकऱ्या देण्याच्या आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं? हे भाजप (BJP) आणि जेडीयूच्या (JDU) एनडीए सरकारनं सांगावं, असा सवाल त्यांनी केलाय. राघोपूरच्या आमदारानंही राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या आलेखावर सरकारची खिल्ली उडवलीय. बिहारमध्ये दर चार तासांनी कुणावर तरी बलात्कार होतोय आणि दर पाच तासांनी कुणाचा तरी खून होतोय, असं त्यांनी नमूद केलंय.

Related Stories

देशात सक्रिय रुग्णसंख्या लाखांखाली

Patil_p

कोरोनामुळे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा मृत्यू

prashant_c

उदयनराजे भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट ; म्हणाले…

Archana Banage

नव्या निवडणुका जाहीर करू नका

Patil_p

महाराष्ट्रात उच्चांकी कोरोना रुग्णवाढ

datta jadhav

आत्महत्या की घातपात ; बिळूरात आईसह तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू

Archana Banage