Tarun Bharat

नितीश कुमार सरकारमधील कॅबिनेट मंत्री विनोद कुमार सिंह यांचे निधन

Advertisements

ऑनलाईन टीम / पाटणा : 


बिहार सरकारमधील कॅबिनेट मंत्री विनोद कुमार सिंह यांचे दिल्लीतील मेदांता रुग्णालयात आज निधन झाले. 


मिळालेल्या माहितनुसार, मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. नितीश कुमार सरकारमधील मंत्री विनोद सिंह यांना जूनमध्ये कोरोनाची लागण झाली होती. उपचाादरम्यान त्यांनी कोरोनावर मात देखील केली. मात्र, 16 ऑगस्टला त्यांना पुन्हा ब्रेनस्ट्रोक झाला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी पुन्हा दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान, ते कोमात गेले. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावत गेली. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


मंत्री विनोद कुमार यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी त्यांना शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. विनोद कुमार हे मूळचे बिहार मधील कटीहार येथील रहिवासी होते. ते प्राणपुर विधानसभा येथील आमदार होते. दरम्यान, यंदाच्या बिहार निवडणुकीत बीजेपीकडून त्यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आले आहे. 

Related Stories

त्रिसरण, पंचशीलाचे आचरण करा : भंते संबोधी

Abhijeet Khandekar

भारतीय दूतावासांची इम्रान खान यांच्याकडून प्रशंसा

Amit Kulkarni

अन् रडू लागले विमानातील प्रवासी

Patil_p

राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेलं पत्र ‘स्क्रिप्ट’चा भाग

datta jadhav

एकाचवेळी 9 न्यायाधीशांनी घेतली शपथ

Patil_p

सीमाभागात बारकाईने लक्ष ठेवणार ‘भारत’ ड्रोन

datta jadhav
error: Content is protected !!