Tarun Bharat

नितीश बेलुरकरला अ. गो. ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद

Advertisements

क्रीडा भारती गोवातर्फे आयोजन

क्रीडा प्रतिनिधी /फोंडा

क्रीडा भारती गोवातर्फे आयोजित केलेल्या अखिल गोवा खुल्या ब्लीट्ज ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत फिडेमास्टर नितीश बेलुरकरने अजिंक्यपद पटकावले. फोंडा तालुका बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने ही स्पर्धा घेण्यात आली. याला गोवा बुद्धिबळ संघटनेची मान्यता लाभली होती. यात 165 स्पर्धकांनी भाग घेतला.

तिसवाडीच्या नितीश बेलुरकरने 9 फेऱयांतून 9 गुण पटकावले. सालसेतच्या रुबेन कुलासो व फोंडाच्या देवेश आनंद नाईकने द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त केले. त्यांचे प्रत्येकी 7.5 गुण झाले. पार्थ साळवी, वसंत नाईक, रुत्वीज परब, उत्कर्ष गणपुले, साईश फोंडेकर, अथर्व काटकर, चैतन्य गावकर, वूमन कँडीडेट मास्टर स्वेरा ब्रागांझा, मंदार लाड, श्रीलक्ष्मी कामत, आदित्य तांबा व प्रज्वल हेदे यांनी अनुक्रमे 4 ते 15 क्रमांक प्राप्त केले. 7 वर्षाखालील मुलांच्या गटात आदित्य दुबळे, मुलींच्या गटात म्युरीयल फर्नांडिस, 9 वर्षाखालील मुलांच्या गटात सारस पोवार, मुलींच्या गटात रुद्रा उसकईकर, 11 वर्षाखालील मुलांच्या गटात रुदय मोरजकर, मुलींच्या गटात रिद्धी गावडे, 13 वर्षाखालील मुलांच्या गटात सागर शेट्टी व मुलींच्या गटात आर्या दाभोळकर यांना विजेतेपद प्राप्त झाले. मुख्य आर्बीटर म्हणून गोवा बुद्धिबळ संघटनेचे संयुक्त खजिनदार विल्सन क्रूज यांनी काम पाहिले. फोंडा तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष सागर साकोर्डेकर, सचिव अमोघ नमशीकर, कार्यकारिणी सदस्य जयवंत हमन्नावर, आनंद कुर्टीकर, क्रीडा भारतीचे सुदेश ठाकूर, कर्नल मंगेश दाणी, संतोष देसाई व अनू मोडक यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

निवडणुकीच्या कथित आरोपातून मंत्री सुभाष शिरोडकर मुक्त

Omkar B

पेडणे सार्वजनिक गणेशोत्सवाचे सुवर्णमहोत्सवात पदार्पण साधेपणाने व सरकारी नियम पाळून 11 दिवस साजरा होणार

Omkar B

मळार-ओल्ड गोवा येथे कीर्तन प्रशिक्षण सुरु

Amit Kulkarni

अविश्वास ठराव आणण्यात आमदारांची भूमिका नाही

Patil_p

‘इंडियन पॅनोरमा’त भारतीयत्वाचे दर्शन

Amit Kulkarni

फोंडा-पणजी महामार्गावर झाड कोसळले

Amit Kulkarni
error: Content is protected !!