Tarun Bharat

नितेश राणेंचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आता नितेश राणे यांच्या वकिलांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे म्हंटले आहे.

दरम्यान, नितेश राणे यांचा जामीन अर्ज जिल्हा स्तर न्यायालयाने फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच राणे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. नितेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडवली आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते जात असताना पोलिसांनी त्यांच्यासमोर आपल्या गाड्या लावल्या आहेत. यामुळे माजी खासदार निलेश राणे आक्रमक झाले आहेत. थांबविण्याचे आदेश दाखवा, अशी त्यांनी मागणी केली आहे. भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. कुठल्या अधिकाराखाली थांबवलं, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं दहा दिवसांची मुदत दिली आहे. त्यापूर्वी नितेश राणेंना अटक करता येणार नाही, असं सरकारी वकिलांनी सांगितलं आहे.

भाजपा आमदार नितेश राणे कोर्टातून निघत असताना पोलिसांनी न्यायलयाबाहेरच त्यांची गाडी अडवली आहे. पोलीस गाडीसमोर उभे राहिले आणि ते फोनवर वरिष्ठांशी बोलत असल्याचं सांगू लागले. मात्र बराच वेळ हा प्रकार सुरु असल्याने निलेश राणे संतापले आणि पोलिसांसोबत वाद घालू लागले. “कुठल्या अधिकाराखाली गाडी थांबवलीय सांगा,” असं म्हणत निलेश राणेंनी पोलिसांना सवाल केला. सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून १० दिवसांचं संरक्षण दिलेलं असल्याने नितेश राणेंना अटक करता येणार नाही असा दावा राणे समर्थक करत होते.

Related Stories

डेंग्यूमुळे प्लेटलेट्सच्या मागणीत वाढ

datta jadhav

कांदा मार्केटच्या जागेबाबत नवे वळण

Nilkanth Sonar

पुणे विभागातील 2 लाख 51 हजार 521 रुग्ण कोरोनामुक्त 

Rohan_P

तबलिगी जमातीनेच कोरोनाचा व्हायरस सर्वत्र पसरवला : योगी आदित्यनाथ

Rohan_P

बिहारमध्ये आता संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार : नितीश कुमार

Rohan_P

२५ जानेवारीला जलक्रीडा व्यावसायिकांसाठी व्यवसाय नोंदणी मार्गदर्शन कार्यशाळा

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!