Tarun Bharat

नितेश राणेंना अटक की दिलासा? जामीन अर्जावर आज सुनावणी

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांना १८ डिसेंबरला कणकवलीत मारहाण झाली. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. चौकशीदरम्यान त्याने नितेश राणे यांचं नाव घेतलं. आणि या संपूर्ण प्रकरणात नितेश राणे यांचाच हात असल्याची टीका शिवसेनेने केली. नितेश राणे यांचे नाव घेतल्यानंतर त्यांची याप्रकरणी कणकवली पोलिसांनी चौकशीदेखील केली. नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारला. त्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाकडूनही नितेश राणे यांना दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने नितेश राणेंना योग्य कोर्टात दाद मागावी असा सल्ला दिला. तसेच जिल्हा न्ययालयात दहा दिवसात हजर होण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजर झाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे यांचा अटकूपर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळला. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास तसंच नियमित जामिनासाठी अर्ज करावा असे निर्देश दिले होते. यासाठी कोर्टाने नितेश राणे यांना १० दिवसांची मुदत दिली होती. तसंच तोपर्यंत त्यांना अटक करु नये असे निर्देश देत दिलासा दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. सरकारी वकिल अनुपस्थित असल्याने शुक्रवारी सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यान आज नितेश राणेंच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.

Related Stories

सोलापूर ग्रामीणमध्ये २५ कोरोनाबाधितांची भर

Abhijeet Shinde

…म्हणून भारत-पाक सामना पाहायला गेलेल्या गृहमंत्र्यांना पाकने मायदेशी बोलावलं

datta jadhav

चीनच्या Helo Lite सह अन्य अ‍ॅप्सवरही भारत घालणार बंदी

datta jadhav

दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार: शिक्षणमंत्री

Abhijeet Shinde

भारत-ऑस्ट्रेलिया दौरा कार्यक्रम निश्चित

Omkar B

कर्नाटकातून विक्रीसाठी आणलेल्या सव्वापाच लाखाचा रेशनचा तांदूळ जप्त, चालकास अटक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!