Tarun Bharat

नितेश राणेंना जेल की बेल?; आज होणार निर्णय

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर कणकवली येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर सरकारी वकिलांचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने मंगळवारी अपूर्ण राहिलेल्या या प्रकरणावर आज दुपारी 3 वाजता सिंधुदुर्ग न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. या प्रकरणावर न्यायालय काय निकाल देतयं यावर राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाआघाडीचे प्रचारप्रमुख आणि शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणी पोलीसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. हा हल्ला नितेश राणेंच्या सांगण्यावरुन झाल्याचा आरोप फिर्यादी संतोष परब यांनी केलेला आहे.

दरम्यान, नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी या हल्ल्यात नितेश राणे आणि गोटय़ा सावंत यांचा कोणताही संबंध नाही. जिल्हा बँक निवडणूक संदर्भात जाणीवपूर्वक नितेश राणे यांच नाव गोवण्यात आले आहे, असा युक्तीवाद मंगळवारी न्यायालयात केला. नितेश राणे दोन वेळ पोलीस चौकशीसाठी पोलीस स्थानकात हजर होते. मात्र, नितेश राणे यांनी मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात जात असताना जो आवाज काढला त्याचा राग ठेऊन त्याला नितेश राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आहे. तब्बल तीन तास हा युक्तीवाद सुरू होता. अखेर न्यायालयाने ही सुनावणी आजवर ढकलली. त्यामुळे आज दुपारी यावर निर्णय होणार आहे.

Related Stories

अर्थमंत्री थोड्याच वेळात अर्थसंकल्प मांडणार

datta jadhav

मिरजेत पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी करणाऱ्या दोघांना अटक

Abhijeet Shinde

“वाघ आहे मी लक्षात ठेवा; कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही,” चित्रा वाघ यांचं ट्वीट

Abhijeet Shinde

जाणीव नसलेल्या यादीमध्ये ‘बंटी पाटील’ टॉपला!

Sumit Tambekar

पालघर हत्याकांड : पीडितांची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा अपघातात मृत्यू

Rohan_P

बांबर्डेतील मायरिस्टीका जैवविविधता वारसा स्थळ घोषित

NIKHIL_N
error: Content is protected !!