Tarun Bharat

नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली

१० दिवसात जिल्हा कोर्टात हजर होण्याचे निर्देश

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे.नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाकडूनही नितेश राणे यांना दिलासा मिळालेला नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतील शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला होता. त्याविरोधात राणेंनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. ज्येष्ठ वकील मुकूल रोहोतगी त्यांची बाजू मांडत होते. मात्र, आज त्यांना फक्त १० दिवसांचा दिलासा मिळाला आहे. १० दिवसात जिल्हा कोर्टात हजर न झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

नितेश राणेंची अटकपूर्व जामीनासाठी धावपळ सुरू होती. मात्र, त्यांना हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दणका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे यापुढे राणे अटक केल्यानंतर जामीनासाठी अर्ज करू शकतात. तसेच त्यांना न्यायालयात हजर व्हावं लागणार आहे

Related Stories

कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या

datta jadhav

सचिन वाझेंची 3 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत रवानगी

Rohan_P

पायल रोहतगी आणि जीशान खानमध्ये जुंपली

Abhijeet Shinde

चिंता वाढली : देशात 9996 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

परदेश शिष्यवृत्तीसाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ

Abhijeet Shinde

भारतात कोरोनामुळे अजून वाईट स्थिती येईल; गुगलचे सुंदर पिचाईंचा इशारा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!