Tarun Bharat

नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज बुधवारी मागे घेतला. त्यांनतर ते कणकवली दिवाणी न्यायालयात हजर झाले. नितेश राणे कोर्टात हजर झाल्यांनतर त्यांना पोलीस कोठडी मिळणार की बेल मिळणार याकडे प्रतीक्षा लागून राहिली होती पण त्यांना न्यायालयाने ४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज नितेश राणे यांची पोलीस कोठडी संपली. यांनतर त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार
पोलीस कोठडीची मुदत वाढवण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळत लावली आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता लगेचच जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठीचा अर्ज दाखल करणार असल्याची माहिती नितेश राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे व संग्राम देसाई यांनी दिली आहे.

Related Stories

महाराष्ट्र : कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट

Rohan_P

आपचे मंत्री सत्येंद्र जैन यांना ९ जूनपर्यंत ईडी कोठडी

Abhijeet Shinde

चुना कसा लावायचा हे वेळ आल्यावर दाखवेन ; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल

Abhijeet Shinde

हिमाचल प्रदेश : 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार लसीकरणाचा दुसरा टप्पा

Rohan_P

कोरोनाची धास्ती : बिहारमध्ये 6 सप्टेंबरपर्यंत वाढवले लॉक डाऊन

Rohan_P

मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया आजपासून

Rohan_P
error: Content is protected !!