Tarun Bharat

……… नितेश राणे जनतेची जाण काय ठेवणार ?

वेंगुर्ले / वार्ताहर:

 मुंबई येथील भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना नितेश राणेंची स्मृती हरवली. कारण पत्रकाराने केसरकर दीपक असे नाव घेतल्यानंतर कोणते ते ? कोण आहेत ते ?अशी विचारणा केली. याचा अर्थ ज्यांनी तीन वेळा आमदार व नारायण राणे यांच्या दहशतवादी साम्राज्याला सुरुंग लावण्याचे काम केले. व जे विधानसभा सदस्य म्हणून सहकाऱ्यांचा ज्याला विसर पडतो ते निलेश राणे कोकणातील जनतेची काय जाणं ठेवणार ? असा प्रश्न आता सिंधुदुर्गातील जनतेला पडलेला आहे. अशी परखड प्रतिक्रिया वेंगुर्ले तालुका शिवसेनाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.  तसेच सामान्य शिवसैनिकांनी झेंडे लावून शिवसेना वाढवली व ह्या लोकांना मोठे केले त्याची वेळ आता भाजपचे झेंडे लावण्याची आली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शिवसैनिक किरण सामंत यांच्याबद्दल, नितेश राणे यांनी स्वतः माफिया व खंडणी वसूल करणारे असल्याचे प्रथम मान्य करावे व नंतरच शिवसैनिक किरण सामंत यांच्याबद्दल बोलावे. ज्यांनी शून्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन विश्व तयार करून जनतेला न्याय हक्कासाठी नेहमी कार्यतत्परतेने काम केले. यांच्याबद्दल बोलण्याच्या नैतिक अधिकार त्यांना नाही. अशी परखड प्रतिक्रिया वेंगुर्ले तालुका शिवसेना प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Related Stories

कुटुंबाचा आधार ठरलेल्या अकरा महिलांचा सन्मान

NIKHIL_N

चिपळुणात मंदार कॉलेजच्या दहा विद्यार्थ्यांना कोरोना!

Patil_p

रत्नागिरीत एटीएम फोडण्याचा चोरटय़ांचा प्रयत्न फसला

Patil_p

सागरी सुरक्षा कवच मोहिमेची रेड टीम देवगडात ताब्यात

NIKHIL_N

गणेशोत्सवासाठी रेल्वे सुरू होण्याचा निर्णय अधांतरीच

NIKHIL_N

रत्नागिरी : नारंगीच्या पुरात अडकलेल्या ४० शेतकऱ्यांचे वाचवले प्राण

Archana Banage