Tarun Bharat

नितेश राणे यांना अटक होणार? आज कोर्टात सुनावणी

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक आणि जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे अडचणीत येण्याची शक्यता आहे. नितेश राणेंचं या प्रकरणात नाव आल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संतोष परब हल्ला प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांचे नाव आल्याने ते अडचणीचे येण्याची शक्यता आहे. त्यांना या प्रकरणात अटकही होऊ शकते.त्यामुळे नितेश राणे यांनी जिल्हा स्तर न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. आज दुपारी अडीचनंतर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोर्टात दोन्ही बाजूंकडून वकिलांची फौज उभी करण्यात आली आहे. नितेश राणे यांच्यातर्फे बाजू मांडताना वकील संग्राम देसाई हे युक्तिवाद करतील. त्यावेळी त्यांच्याबरोबर राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर, उमेश सावंत, अविनाश परब, प्रणिता कोटकर, प्राजक्ता शिंदे या कायदेतज्ज्ञांची टीम सहकार्यासाठी असणार आहे. तर विशेष सरकारी वकील म्हणून प्रदीप घरत आणि भूषण साळवी यांची नियुक्ती करण्यात आली असून ते राज्य सरकारतर्फे युक्तिवाद करतील. दुसरीकडे नारायण राणे नागपूर दौरा सोडून कणकवलीत आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. तर नितेश राणे यांना अटक होण्याची भीती असल्याने ते दोन दिवसापासून नॉट रिचेबल आहेत.

Related Stories

भारतात 24 तासात जवळपास वीस हजार नवे कोरोना रुग्ण; 410 मृत्यू

datta jadhav

गुड न्यूज : लसीच्या चाचणीसाठी पुण्याच्या ‘सिरम इन्स्टिट्यूट’ला डीसीजीआयची परवानगी

Rohan_P

शेतकऱ्यांना संकटातून तातडीनं बाहेर काढणं गरजेचं; अजित पवारांनी घेतली राज्यपालांची भेट

Abhijeet Khandekar

केंद्र सरकार रेमडेसिविरचा पुरवठा थांबवणार

Abhijeet Shinde

भारताचा पराभव झाल्यानंतर काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण

Abhijeet Shinde

‘पवारांचाच मराठा, ओबीसी आरक्षणाला विरोध’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!