Tarun Bharat

निधीअभावी शहरातील प्रकल्प रखडणार नाहीत

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्‍वासन

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

मुख्य शहरासह हद्दवाढ भागातही पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. शहराचा समतोल विकास साधण्यासाठी मनपा प्रशासनाने एफएसआय, टीडीआर आणि एआरच्या माध्यमातून उत्पन्न वाढवावे. शहरातील रस्ते, ड्रेनेज यांसह स्मार्ट सिटी अंतर्गत प्रस्तावित असलेली उड्डाणपूल, समांतर जलवाहिनी आदी कामांकरिता निधीची कमतरता भासणार नाही, असे आश्‍वासन नगरविकास मंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूरकरांना दिले.

सोलापूर नियोजन भवन येथे नगरविकास मंत्री एकनाथ, प्रधानसचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्त पी. शिवशंकर, स्मार्ट सिटी सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. राजेंद्र राऊत, आ. प्रशांत परिचारक, आ. बबनराव शिंदे, आ. संजय शिंदे आदींच्या उपस्थित महापालिका, नगरपालिकांची तालुकानिहाय आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

ते म्हणाले की, राज्यातील कामकाजात सुसूत्रता यावी, नियमांवलीमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी सर्वच शहर, नगरपालिकांमध्ये बांधकाम विभागासाठी एकच नियम लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. तसेच हद्दवाढ भागातील गुंठेवारी परवान्याला मुदतवाढ देत सर्वसामान्य जनतेची अडचण दूर झाली आहे. कोरोनामुळे निधीची कमतरता असली, तरी शहराचा विकास व्हावा, यासाठी नगरविकास विभागाकडून निधीची कमतरता पडणार नाही. अनावश्यक खर्च टाळून जनतेशी निगडित विषयाला महत्त्व देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच यावेळी प्रशासनाने शहर व जिल्ह्यातील चालू विकास कामांचे सादरीकरण केले. तर पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष यांनी आपल्या तालुक्यातील समस्या प्रखरतेने मांडल्या.

Related Stories

महाराष्ट्र : 10 वी,12वी च्या परीक्षांच्या तारखा जाहीर : शिक्षण मंत्र्यांची घोषणा

Tousif Mujawar

राज्यातील शाळांना उन्हाळ्य़ाची सुट्टी जाहीर

Abhijeet Khandekar

छत्रपती संभाजीराजे माझे भाऊच

Patil_p

सोलापूर : बाल गणेश मंडळ स्थापल्यास पालकांवर गुन्हा दाखल करणार

Archana Banage

भावी नगरसेवकाचा पालिकेत धिंगाणा

Patil_p

खुशखबर : महाराष्ट्रात राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी

Tousif Mujawar