Tarun Bharat

निपाणीत डॉल्बीचा दणदणाट, प्रशासन हतबल

गणेश मंडळांच्या उत्साहाला राजकीय पाठबळ : डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई : नागरिकांना त्रास

प्रतिनिधी /निपाणी

निपाणी शहर व उपनगरात विविध सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होते. गेल्या चार दिवसात मात्र काही ठिकाणी विसर्जनप्रसंगी डॉल्बीचा दणदणाट झाल्याचे दिसून आले. काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बी लावणारच अशी भूमिका घेतल्यामुळे तसेच त्याला राजकीय पाठबळदेखील मिळाल्यामुळे प्रशासनही हतबल झाल्याचे दिसून आले. परिणामी रात्री 7 ते 9 या वेळेत डॉल्बीला अप्रत्यक्षपणे परवानगी मिळाल्याचे पहायला मिळाले.

   कोरोना प्रतिबंधक नियमावलीचा विचार करता यंदा सार्वजनिक गणेशोत्सव होणार की नाही? याबाबत संभ्रमावस्था होती. मात्र गणेश मंडळांनी गणेशोत्सव करणारच! अशी ठाम भूमिका घेतल्यामुळे सरकारनेही अखेरच्या क्षणी सार्वजनिक गणेशोत्सवास परवानगी दिली. यावेळी मंडपात अधिक गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या. नियमावलीचे पालन करण्याच्या अटीवर गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात आली.

सुरुवातीला पाच दिवस गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. यानंतर अनंत चतुर्दशीपर्यंत ही परवानगी वाढविण्यात आली. दरम्यान, विसर्जन काळात कोणतीही साऊंड सिस्टिम लावण्यासाठी परवानगी नव्हती. पण निपाणी शहर व परिसरात डॉल्बीसाठी गणेश मंडळांचा आग्रह सुरू झाला. मात्र सुरुवातीला पोलीस प्रशासन डॉल्बीबंदीवर ठाम होते. अशावेळी गणेश मंडळांनीही डॉल्बी लावण्यावर आग्रह धरल्याने तसेच त्याला राजकीय पाठबळ मिळाल्याने पोलिसांचाही नाईलाज झाला. परिणामी कित्येक दिवसांनंतर शहरात डीजेच्या तालावर तरुणाई थिरकल्याचे दिसून आले.

ग्रामीण भागात मात्र कारवाई

एकीकडे निपाणी शहरात डॉल्बीचा दणदणाट सुरू असताना ग्रामीण भागात मात्र पोलिसांनी डॉल्बी लावणाऱया मंडळांवर कारवाईचा बडगा सुरू ठेवला. या दुजाभावामुळेही ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केली. परवानगी द्यावी तर सर्वांनाच अन्यथा कुणालाही नको, अशी भूमिका मंडळानी मांडली.

Related Stories

दुसऱया दिवशीही विमानसेवेला बसला फटका

Amit Kulkarni

जायंट्स सखीतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार

Patil_p

किरकोळ भाजीपाला बाजारात टोमॅटो घसरला

Patil_p

महानगरपालिकेचे दरवाजे नागरिकांसाठी बंद!

Patil_p

बलभीम साहित्य संघ कार्यकारिणीची निवड

Patil_p

शेतकऱयांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Amit Kulkarni