Tarun Bharat

निपाणीत पोलिसांची तलाठय़ास मारहाण

तलाठय़ांकडून कामबंद आंदोलन

प्रतिनिधी/ निपाणी

निपाणी येथील तहसीलदार कार्यालयातून कोरोना काळात सेवा बजाविण्यासाठी जात असलेल्या गळतगा येथील तलाठय़ास निपाणी शहर पोलिसांनी धर्मवीर संभाजी चौक येथे मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. त्यामुळे तालुक्यातील तलाठय़ांनी आक्रमक होवून कामबंद आंदोलन करीत, पोलिसांवर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन दिले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गळतगा येथील तलाठी मल्लिकार्जुन ह†िरजन हे गळतगा गावात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने येथील कार्यालयातून गळतगाकडे जात होते. हरिजन हे दुचाकीवरुन धर्मवीर संभाजी चौक येथे आले असता येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी हरिजन यांना लाठीने चोप दिला. त्यामुळे कोरोना काळात सेवा देत असतानाही विनाकारण पोलिसांच्या होत असलेल्या या अरेरावीविरोधात तलाठय़ांच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देत दोषी पोलिसांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी एस. एम. पोळ, आर. एम. हंजी, एस. एस. मुल्ला, ए. जे. वंजुळे, एन. आर. पाटील, एस. व्ही. न्हावी, मनोज कांबळे, एम. एस. पुजारी, के. एल. पुजारी, विजय अंगडी, संतोष गट्टी, विनायक दावणे आदी उपस्थित होते. कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱयांना कर्फ्यू काळात सेवा देण्याची मुभा खुद्द शासनाने दिलेली असतानाही पोलिसांकडून होत असलेल्या या बेजाबदारपणाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

Related Stories

येळ्ळूरच्या राजवीर बिर्जेला सुवर्ण

Amit Kulkarni

सावंतवाडी संघाकडे लोकमान्य प्रिमियर लीग चषक

Amit Kulkarni

बीबीसी बेकरीच्या उद्यमबाग शाखेचे उद्घाटन

Patil_p

शेतकऱ्याची चेन पळविणाऱ्या त्रिकुटाला अटक

Tousif Mujawar

कुद्रेमनी येथे बैलगाडा ओढण्याच्या शर्यतीचे उद्घाटन

Amit Kulkarni

जामीन मिळूनही विनय कुलकर्णींची सुटका नाही

Amit Kulkarni