Tarun Bharat

निपाणी उद्यापासून अंशतः चालू; या सेवा राहणार सुरू

अमर गुरव / निपाणी

तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्यावतीने ग्रीन व ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांना अंशतः शिथिल करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार बेळगाव जिल्ह्यात हुक्केरी,रायबाग व बेळगाव तालुके वगळता अन्य नऊ तालुक्यांमध्ये ऑरेंज झोन आहे. या ऑरेंज झोनमध्ये समावेश असलेल्या निपाणीत सोमवारपासून अंशतः व्यवहार सुरू राहणार आहेत. असे असले तरी सदर व्यवहार होत असताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन मात्र अत्यावश्यक आहे.

सवलत देण्यात आलेल्या सेवा या सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत मात्र कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.

चला तर पाहूया कोणत्या सेवा राहणार सुरू व कोणत्या सेवा राहणार बंद

(या सेवा राहणार सुरू)

-सर्व प्रकारची किराणा दुकाने
-भाजी मार्केट
-इलेक्ट्रिकल दुकाने
-बेकरी
-जिल्ह्यांतर्गत टॅक्सी वाहतूक ( चालक व 2 प्रवासी इतकीच क्षमता)
-हार्डवेअर दुकाने
-प्लायवूड विक्री
-सर्व प्रकारची बांधकाम साहित्य दुकाने
-हॉटेल (केवळ पार्सल सुविधा)
-वाईन्स शॉप
-शेतीशी संबंधित सर्व गोष्टींना परवानगी. शेतीमालाच्या विक्रीलाही परवानगी.
-दुचाकी प्रवास (केवळ एकच व्यक्ती आवश्यक)
-बँक, सहकारी संस्था, सरकारी कार्यालये
-कुरिअर, पोस्ट सेवा
-ऑनलाइन शॉपिंग
-रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभाग (OPD) सुरू ठेवता येईल. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील. या सेवांना परवानगी देण्यात आली आहे

या सेवा राहणार बंद

-इलेक्ट्रॉनिक्स दुकाने ( मोबाईल, फ्रीज, टीव्ही आदी)
-कापड दुकाने
-सराफ दुकाने
-मॉल
-चित्रपटगृहे
-सर्व धार्मिक स्थळे
-सभा, समारंभ कार्यक्रम बंदी
-शाळा, महाविद्यालये
-जिम
-रिक्षा, सायकल रिक्षा, टॅक्सी, कॅब, बसेस, सलून, स्पा.
-सार्वजनिक बस वाहतूक
-65 वर्षांपेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्ती, आजरी व्यक्ती, गरोदर स्त्रिया आणि 10 वर्षांखालची मुलं घराबाहेर पडणार नाहीत. ते केवळ वैद्यकीय कारणांसाठी घर सोडू शकतात.

(याशिवाय महत्त्वाचे)

-ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये जाहीर झालेल्या मार्ग सूचीनुसार लग्नकार्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी दोन्ही बाजूची वऱ्हाड मंडळी, आचारी आधी सर्वजण मिळून जास्तीत जास्त 50 व्यक्ती उपस्थित राहू शकतात. यावेळीही मास्क वापरणे व सोशल डिस्टन्स अत्यावश्यक आहे.

  • अंत्ययात्रा व अंत्यसंस्कारावेळी 20 हून अधिक व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही

वरील सेवांव्यतिरिक्त अन्य सेवांबाबत माहिती हवी असल्यास नगरपालिका व तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

आंतर विभाग शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

Amit Kulkarni

आता कॅम्पमधील गतिरोधक वाहनधारकांना धोकादायक

Amit Kulkarni

गुंजेनहट्टी होळी-कामाण्णा यात्रोत्सव उद्या

Amit Kulkarni

हुन्नूर येथे मृतदेह ठेवून निदर्शन

Patil_p

न्यायालयासमोर पुन्हा पक्षकारांची गर्दी

Amit Kulkarni

जनतेला ध्येयाप्रती पोहोचविण्यास सक्रीय रहा

Amit Kulkarni