Tarun Bharat

निपाणी-देवगड राज्यमार्गावर ट्रकचालकाचा खुन

राधानगरी / प्रतिनिधी

निपाणी देवगड या राज्यमार्गावरील राधानगरी पासून 15 की मी अंतरावर असलेल्या शेळप बांबर जवळ तरलोकसिंग धरमसिंग (वय५४) या ट्रँकरचालकाचा खुन करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे, ट्रँकरच्या केबीनमध्येच त्याचा मृतदेह आढळून आलाआहे याबाबत राधानगरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असुन मृत ट्रँकरचालक पंजाब राज्यातील आहे.

याबाबत राधानगरी पोलिसांच्या कडून मिळालेली माहिती अशी, निपाणी देवगड या 178 राज्यमार्ग आहे, या महामार्गावर राधानगरी पासून 15 की मी अंतरावर शेळप बांबर दरम्या टँकर नंबर PB-06-BA-7626 हा टँकर चालक तरलोकसिंग धरमसिंग याने रस्त्याच्या बाजुला लावल्याचे जी.पी.आर.एस.सिस्टीमव्दारे टँकरमालकांना समजले. त्यानुसार चौकशी केली असता या चालकाचा केबीनमध्ये खुन केल्याचे निदर्शनासआले. त्याच्या डोक्यावर, कानामागे वार झाल्याचे दिसुन आले. दोन अज्ञातानी दोन दिवसापुर्वी हा खुन केला असल्याचा पोलीसांना संशय आहे. त्यानुसार राधानगरी येथील एका ठिकाणचे सी.सी.टी.व्ही. फुटेजही पोलीसांच्या हाती लागले असुन लवकरच आरोपींना अटक केले जाईल असे राधानगरी पोलिसांनी सांगितले. याबाबतचाअधिक तपास राधानगरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक आप्पासो कोळी, उपनिरीक्षक नजीरखान, सुरेश मेटील, कृष्णात यादव आदी करत आहेत.

Related Stories

जोडीदार असावा तर असा

Patil_p

केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये आजपासून ई-ऑफिस प्रणाली लागू; केंद्रीय राज्यमंत्र्यांची माहिती

Abhijeet Khandekar

अंबाबाईचे दर्शन ऑनलाईन बुकींगनंतरच !

Archana Banage

इम्रान खान यांना निवडणूक आयोगाचा दणका; 5 वर्षांसाठी ठरवलं अपात्र

datta jadhav

कोल्हापूर : गडमुडशिंगी येथील ‘त्या’ मायलेकींची आत्महत्या नसून खून झाल्याचे उघड

Archana Banage

पेठ वडगाव बाजार समितीवर सत्ताधारी आघाडीचा एकतर्फी विजय

Abhijeet Khandekar